गोव्याची 'Epstein File', नगरसेवकाच्या 22 वर्षीय मुलाने 25 ते 30 अल्पवयीन मुलींवर केले अत्याचार
Goa Crime News : दक्षिण गोव्यातील नगरसेवकाच्या मुलाने 25 ते 30 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सोहम नाईकला अटक केली आहे. मद्यपानाच्या पार्टीत मित्रांना व्हिडिओ दाखवल्यामुळे हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गोव्याची 'Epstein File'
भाजप नगरसेवकाच्या 22 वर्षीय मुलाने 25 ते 30 अल्पवयीन मुलींवर केले अत्याचार
Goa Crime News : दक्षिण गोव्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या एका अत्यंत धक्कादायक लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. 22 वर्षीय सोहम नाईक याने तब्बल 25 ते 30 अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गोव्यामध्ये मोठी खळबळ उडाली असून संशयित सोहम हा कुडचडे पालिकेतील एका स्थानिक नगरसेवकाचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून अखेर त्याला बेड्या ठोकल्या असून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मद्यपानाच्या पार्टीत झाला अघोरी कृत्यांचा पर्दाफाश
सोहम नाईक याने गेल्या 3 वर्षात किमान 25 ते 30 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे संपूर्ण प्रकरण एका मद्यपानाच्या पार्टीमुळे उघडकीस आले. गेल्या आठवड्यात एका पार्टीदरम्यान आरोपी सोहम याने आपल्या मित्रांना काही अश्लील व्हिडिओ दाखवले होते, ज्यावरून या संपूर्ण सेक्स स्कँडलचा गौप्यस्फोट झाला. त्याने पीडित मुलींना त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन हे कृत्य केल्याचा आरोप आहे. Madegal-Cacora येथील रहिवासी असलेल्या या तरुणाने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले असून या प्रकरणाची चर्चा सध्या संपूर्ण गोव्यात सुरू आहे.
हेही वाचा : प्रेमविवाह केल्याने तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाची नग्न धिंड काढली, जळगावातील भुसावळमध्ये लाज आणणारी घटना
राजकीय संबंध आणि पोलिसांसमोर तक्रारींचे आव्हान
संशयित सोहम नाईक हा स्थानिक भाजप नगरसेवकाचा मुलगा असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली तेव्हा मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक कुडचडे पोलीस ठाण्यात जमा झाले होते. या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही, कारण अनेक पालकांनी सामाजिक प्रतिष्ठा आणि भीतीपोटी पुढे येण्यास असमर्थता दर्शवली आहे. मात्र पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याचे कृत्य समाजासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. आरोपीच्या मोबाईलमधील व्हिडिओ आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत.










