प्रेमविवाह केल्याने तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाची नग्न धिंड काढली, जळगावातील भुसावळमध्ये लाज आणणारी घटना

मुंबई तक

Jalgaon crime : जळगावातील भुसावळमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी करुणाला नग्न करून बेदम मारहाण केली. नंतर त्याची गावभर धिंड काढल्याची लज्जास्पद घटना आहे.

ADVERTISEMENT

Jalgaon crime
Jalgaon crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेमविवाह केल्याने तरुणाला नग्न करून गावात धिंड काढली

point

पोलिसांकडून आरोपींवर गुन्हा दाखल

Jalgaon crime : जळगावातील भुसावळमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी करुणाला नग्न करून बेदम मारहाण केली. नंतर त्याची गावभर धिंड काढल्याची लज्जास्पद घटना आहे. या घटनेत पोलिसांनी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : नांदेड :विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भोंदूबाबाचा अत्याचार, बाबा खरातसारखेच आणखी एक प्रकरण

प्रेमविवाह केल्याने तरुणाला नग्न करून गावात धिंड काढली

जखमी तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आल्याची माहिती आहे. भुसावळमधील खडका गावातील चेतन दिलीप जंगले या तरुणाने धनश्री पाटील नावाच्या तरुणीशी विवाह केला होता. तेव्हा काहींनी मिळून त्याला नग्न केले आणि गावात त्याची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

पोलिसांकडून आरोपींवर गुन्हा दाखल

संबंधित प्रकरणात त्याला बेदम मारहाण करण्यात आलीय, लक्षात आल्यावर काही जणांनी मध्यस्ती करून त्याची सुटका केली. यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे वृत्त आहे. पण, या घटनेनं गाव हादरून गेलं आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने मारहाण करणाऱ्या दहा बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सध्या देशात प्रेमप्रकरणावरून हत्येच्या अनेक घटना घडू लागलेल्या आहेत. 

हे ही वाचा : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची हत्या, आधी जीवघेणी मारहाण अन् नंतर विहिरीत फेकले; मित्रानेच केला घात

प्रेम करणं गुन्हा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे काही निष्पाप तरुण-तरुणींनी आपला जीव गमावल्याचं बघायला मिळतं. अशा घटना सतत घडत आहेत, पण यामागे अनेक कारण असू शकतात. 

हे वाचलं का?

    follow whatsapp