नांदेड :विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भोंदूबाबाचा अत्याचार, बाबा खरातसारखेच आणखी एक प्रकरण
Nanded crime : नांदेडमध्ये विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आत्याचार करणाऱ्या भोंदूबाबवर गुन्हा दाखल केला. नुकतेच राज्याला हादरवून टाकणारे भोंदू बाबा खरातचे प्रकरण गाजताना दिसतेय, त्यानंतर नांदेडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नाचे आमिष दाखवून तिनदा लैंगिक अत्याचार
Nanded Crime : नांदेडमध्ये विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आत्याचार करणाऱ्या भोंदूबाबवर गुन्हा दाखल केला. नुकतेच राज्याला हादरवून टाकणारे भोंदू बाबा खरातचे प्रकरण गाजताना दिसतेय, त्यानंतर नांदेडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भोंदू महाराजाने अत्याचार केला. या प्रकरणी 46 वर्षीय हरिदगिरी दत्तागिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : कोल्हापूर : 'मिस यू मम्मा...' शिवाजी विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये गोव्यातील तरुणीची आत्महत्या, आईसाठी लिहिले शेवटचे शब्द
लग्नाचे आमिष दाखवून तिनदा लैंगिक अत्याचार
जुलै 2025 पासून एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिनदा लैंगिक अत्याचार केला. महाराजावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. भोंदू बाब कॅप्टन खरातचे प्रकरण गाजताना नांदेडमध्ये मठातील महाराजावर भाग्यनगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला ताब्यात ताब्यात घेतला, या प्रकरणाची पुढील चौकशी ही भाग्यनगर पोलीस करत आहेत.
हे ही वाचा : यवतमाळ : 6 वर्षाची मुलगी बेपत्ता, 'एवढ्या' दिवसानंतर पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, गावातील घराची झडती सुरु
दरम्यान, राज्यात सध्या कॅप्टन अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाचा कारणामा सर्वांसमोर आला आहे. ज्योतिषाच्या नावाखाली त्याने अनेक महिलांची आणि मुलींची देखील फसवणूक केली. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती आहे. राजकीय क्षेत्रातील लोक देखील अशा प्रकरणात असल्याचा अंदाज आहे.










