डोक्यात दगड घालून ट्रॅक्टर ड्रायव्हरची हत्या, दारु पिऊन सतत भांडायचा, वैतागलेल्या मित्रानेच संपवले
Crime News : एका ट्रॅक्टर ड्राव्हरच्या हत्येचा अवघ्या 36 तासांत उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. मित्रानेच डोक्यात दगड घालून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डोक्यात दगड घालून ट्रॅक्टर ड्रायव्हरची हत्या
दारु पिऊन सतत भांडायचा
वैतागलेल्या मित्रानेच संपवले
Crime News : पोलिसांनी एका भयानक हत्येचा अवघ्या 36 तासांत छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी सोवनाराम गरासिया हा मूळचा उत्तर प्रदेशातील पाली जिल्ह्यातील रहिवासी असून, तो मृत किशन गमेती यांचा सहकारी होता. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला शोधून काढले.
झुडपांमध्ये आढळला मृतदेह
मृत किशन हा उदयपूर जिल्ह्यातील रहिवासी असून तो शिवगंज येथील एका ट्रॅक्टरवर मजदूरीचे काम करायचा. 18 मार्च 2026 रोजी किशनने आपल्या नातेवाईकांना फोन करून चालक सोवनाराम आणि इतर काही जण आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच किशनचा मृतदेह झुडपांमध्ये आढळून आला. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि संशयाची सुई सोवनारामच्या दिशेने वळली.
हे ही वाचा : कोल्हापूर : 'मिस यू मम्मा...' शिवाजी विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये गोव्यातील तरुणीची आत्महत्या, आईसाठी लिहिले शेवटचे शब्द
दारुचे व्यसन आणि हत्या
पोलिस चौकशीत आरोपी सोवनारामने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, मृत किशनला दारूचे प्रचंड व्यसन होते आणि गेल्या 6-7 दिवसांपासून तो सतत दारू पिऊन सोवनारामशी वाद घालत होता. घटनेच्या दिवशी, 18 मार्च रोजी रात्री 8 वाजता किशनने पुन्हा एकदा सोवनारामच्या खोलीवर जाऊन त्याला शिवीगाळ केली. त्यावेळी सोवनारामने त्याला कसेबसे तिथून पाठवले, मात्र काही वेळाने वाटेत पुन्हा गाठ पडल्यावर किशनने पुन्हा वाद उकरून काढला.
हे ही वाचा : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची हत्या, आधी जीवघेणी मारहाण अन् नंतर विहिरीत फेकले; मित्रानेच केला घात
डोक्यात घातला दगड
या सततच्या वादाला आणि शिवीगाळीला कंटाळून सोवनारामने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. त्याने जवळच पडलेला एक मोठा दगड उचलून किशनच्या डोक्यात घातला. यावेळी त्याने एकामागून एक तीन वार केले, ज्यामध्ये किशनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सोवनारामला अटक केली असून, या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.









