बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावासह चौघांकडून पंचायत समितीतील अधिकाऱ्याला बेदम मारहाण, कारण काय? VIDEO

मुंबई तक

Sangamner Crime News : संगमनेर पंचायत समितीतील अधिकाऱ्याला नंदलाल कोकाटे यांना कार्यालयात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शरद थोरात आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. महिला बचत गटाच्या सी.आर.पी.चे मानधन रोखल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची फिर्याद कोकाटे यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावासह चौघांकडून पंचायत समितीतील अधिकाऱ्याला बेदम मारहाण,

point

महिलेच्या मानधनाच्या वादातून मारहाण झाल्याची फिर्याद

Sangamner Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे एका शासकीय अधिकाऱ्याला कार्यालयात घुसून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत भाऊ शरद नाना थोरात आणि त्यांच्या समर्थकांनी पंचायत समितीचे तालुका अभियन व्यवस्थापक नंदलाल पोपटराव कोकाटे यांना त्यांच्याच केबिनमध्ये गाठून मारहाण केली. या प्रकरणी कोकाटे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली असून, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आणि बेदम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी, 23.03.2026 रोजी दुपारी 02.10 वाजेच्या सुमारास घडली असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली  आहे. कोकाटे हे गेल्या 2 वर्षांपासून संगमनेर येथे कार्यरत असून तालुक्यातील महिला बचत गटांचे नियंत्रण आणि बँक कर्जाचे कामकाज पाहतात. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आलाय. 

हेही वाचा : सोलापूरमध्ये उन्हाच्या कडाक्यात थंडावा मिळवण्यासाठी जिवलग मित्र पोहायला गेले, तलावात बुडून दोघांचा दुर्दैवी अंत

महिलेच्या मानधनाच्या वादातून मारहाण 

या वादाचे मूळ शेडगाव येथील महिला बचत गटातील समुदाय संसाधन व्यक्ती (सी.आर.पी.) शितल उगलमुगले यांच्या मानधनात दडलेले आहे. कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उगलमुगले यांच्या कामाबद्दल तक्रारी असल्याने आणि कामगिरी असमाधानकारक असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली होती, परंतु त्यास उत्तर न मिळाल्याने त्यांचे (शितल उगलमुगले) मानधन थांबवण्यात आले होते. याच कारणावरून दुपारी 02.10 वाजता शरद नाना थोरात, शितल उगलमुगले आणि त्यांचे पती कोकाटे यांच्या कार्यालयात आले. मानधन का थांबवले, अशी विचारणा करत थोरात यांनी कोकाटे यांना मारहाण केली. त्यावेळी उपस्थित कर्मचारी नंदकुमार वडेकर आणि भाऊसाहेब शिंदे यांनी मध्यस्थी करून वाद सोडवला, मात्र हा केवळ एका मोठ्या हल्ल्याची सुरुवात होती.

कार्यालयात घुसून सामूहिक हल्ला आणि धमकी

पहिल्या घटनेनंतर काही वेळातच, म्हणजेच दुपारी 02.30 वाजता, 7 ते 8 अनोळखी तरुण कोकाटे यांच्या कार्यालयात शिरले. त्यांनी कोकाटे यांचे नाव विचारून खात्री केली आणि त्यानंतर 4 ते 5 जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये अभिषेक थोरात, ऋषिकेश थोरात, अक्षय भालेराव आणि शिवामृत भोकरे यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती कोकाटे यांनी दिली आहे. "तू शरद नानाला ओळखत नाही का, तुला काय 353 करायचा आहे तो कर, तुझ्याकडे बघून घेतो," अशा शब्दांत आरोपींनी कोकाटे यांना धमकावून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कार्यालयातील ओ.एस. राजेंद्र थिटमे आणि इतर कर्मचाऱ्यांनी धावून येत कोकाटे यांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली.

हे वाचलं का?