अशोक खरातच्या मुलीची उपजिल्हाधिकाऱ्याच्या बायकोसोबत जमिनीची भागीदारी, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा

मुंबई तक

Vijay Kumbhar On Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणी रोज नवनवे दावे समोर येत आहेत. कधी त्याच्या संपत्तीचे थक्क करणारे आकडे समोर येत आहेत; तर कधी त्याचे विकृत चाळे करतानाचे व्हिडिओ. यामुळे सबंध महाराष्ट्रत खळबळ उडाली आहे. खरातचे राजकीय नेत्यांशी असलेले लागेबांधे देखील आता उघड झाले आहेत. अशातच पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेल्या दाव्यामुळे अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

Vijay Kumbhar On Ashok Kharat
Vijay Kumbhar On Ashok Kharat
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अशोक खरातच्या मुलीची उपजिल्हाधिकाऱ्याच्या बायकोसोबत जमिनीची भागीदारी

point

RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा

Vijay Kumbhar On Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणी रोज नवनवे दावे समोर येत आहेत. कधी त्याच्या संपत्तीचे थक्क करणारे आकडे समोर येत आहेत; तर कधी त्याचे विकृत चाळे करतानाचे व्हिडिओ. यामुळे सबंध महाराष्ट्रत खळबळ उडाली आहे. खरातचे राजकीय नेत्यांशी असलेले लागेबांधे देखील आता उघड झाले आहेत. अशातच पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेल्या दाव्यामुळे अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

विजय कुंभार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत भोंदू खरातच्या जमीन प्रकरणाशी संबंधित एक धक्कादायक दावा केला आहे. यामध्ये त्यांनी एका जमीन खरेदीत खरातच्या मुलीची आणि एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीची भागीदारी असल्याचा आरोप केला आहे. विजय कुंभार यांनी केलेली पोस्ट नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

हे ही वाचा : 'ज्याला मूलं-बाळ होतं नाही, त्याला अशोक खरातने सांगताच झालं', मिरगावातील ग्रामस्थ काय म्हणाला? VIDEO

विजय कुंभार यांची सोशल मीडिया पोस्ट जशीच्या तशी

सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये कुंभार म्हणतात की, 'महाराष्ट्राचा एपस्टीन अशोक खरातच्या पत्नीबरोबर जमिनीची भागीदारी करणाऱ्या महिलेचा पती — अभिजीत भांडे पाटील,  उपजिल्हाधिकारी! त्याच्या पत्नीच्या नावावर कंपन्या, रिअल इस्टेट फर्म्स, स्टार्टअप… आणि उघड भागीदारी. हे धाडस कुठून येतं? स्पष्ट आहे — सत्तेचा पाठिंबा.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp