अशोक खरातच्या दहावीच्या रिझल्टची कॉपी समोर, पाहा किती विषयात नापास? कोणत्या विषयात किती मार्क? Photo

मुंबई तक

Ashok Kharat Case : अशोक खरात या भोंदूबाबाच्या 10 वीच्या निकालाची कॉपी समोर आली असून दोन विषयात नापास झाला होता, अशी माहिती समोर आलीये.

ADVERTISEMENT

Ashok Kharat Case
Ashok Kharat Case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अशोक खरातच्या दहावीच्या रिझल्टची कॉपी समोर,

point

पाहा किती विषयात झालाय नापास? कोणत्या विषयात किती मार्क? Photo

Ashok Kharat Case : महिला लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हे दाखल झालेला भोंदू ज्योतिषी व स्वतःला 'कॅप्टन' असे पद  लावणारा अशोक खरात दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे लोकांची जन्मतारीख ऐकून अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणारा खरात हा दहावीच्या परीक्षेत गणित विषयातही नापास झाल्याचे उघड झाले आहे. 154 देशात भ्रमण केल्याचा दावा करणाऱ्या खरातचे समाजशास्त्रातील ज्ञानही जेमतेमच होते. या विषयातही तो दहावीत फेल होता. त्यामुळे त्याचा पुढचा प्रवास नेमकी इतक्या वेगाने कसा झाला, की सुशिक्षित माणसांना 10 वी नापास भोंदूने गंडवत इमले बांधले आहेत ह्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : डॉक्टरचं 25 वर्षीय शेजारणीवर जीवापाड प्रेम, ह्रदयविकाराचा झटका अन् सीएनजी किटचा स्फोट; हादरवणारं प्रकरण

कुठे झालं शिक्षण? पाहा संपूर्ण माहिती 

अशोक खरात याचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) असून तो शिक्षणासाठी दररोज सुमारे चार किलोमीटर पायी चालत वावी येथील माध्यमिक शाळेत येत होता. 1 जून 1965 ही त्याची जन्मतारीख शाळेच्या नोंदींमध्ये त्याचे नाव 'लक्ष्मण एकनाथ खरात' असे नमूद असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : दोन पत्नींसोबत एकाच घरात राहायचा, 18 मुलं झाली...,पण शेवटी पोत्यात मृतदेह सापडलं, मुन्नासोबत काय घडलं?