गर्भवती बायकोच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हॅक्सॉ ब्लेड अन् नंतर.., 4 वर्षांच्या चिमुकलीसमोर घडलं भयानक

मुंबई तक

18 May 2026 (अपडेटेड: 18 May 2026, 01:07 PM)

Chattisgarh Crime News: एका व्यक्तीने आपल्या 23 वर्षीय गरोदर पत्नीची निर्घृण हत्या केली. असा आरोप आहे की, त्याने आधी पत्नीला बेदम मारहाण केली आणि नंतर तिच्या खाजगी भागात लोखंडी धारदार हत्यार 'हेक्सॉ ब्लेड'  टाकले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गर्भवती बायकोच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हॅक्सॉ ब्लेड अन् नंतर..

point

4 वर्षांच्या चिमुकलीसमोर काय घडलं?

Chattisgarh Crime News : छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत वेदनादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या 23 वर्षीय गरोदर पत्नीची निर्घृण हत्या केली. असा आरोप आहे की, त्याने आधी पत्नीला बेदम मारहाण केली आणि नंतर तिच्या खाजगी भागात लोखंडी धारदार हत्यार 'हेक्सॉ ब्लेड'  टाकले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

हे वाचलं का?

घरात चार वर्षांची चिमुकली अन्... 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 14 मे रोजी भिट्ठीकला गावात घडली. प्रदीप अगरिया असे आरोपीचे नाव असून त्याला रविवारी अंबिकापूर येथून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, प्रदीप आणि हिराबाई यांचे लग्न सुमारे पाच वर्षांपूर्वी झाले होते. आरोपी दारूच्या नशेत अनेकदा आपल्या पत्नीला मारहाण करत असे. घटनेच्या दिवशीही त्याने हिराबाईला बेदम मारहाण केली. या घटनेदरम्यान त्यांची चार वर्षांची मुलगीही घरात हजर होती, असे सांगितले जात आहे.

हे ही वाचा : विवाहित महिलेला प्रपोज केलं, नकार दिल्याने झोपल्यानंतर फेकलं अ‍ॅसिड, भयंकर प्रकरण!

अपघातात जखमी झाल्याचा बनाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी झाल्यानंतर हिराबाई जेव्हा बेशुद्ध झाली, तेव्हा आरोपी तिला मोटारसायकलवरून अंबिकापूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात घेऊन गेला. तिथे त्याने डॉक्टरांची दिशाभूल करत आपली पत्नी रस्ते अपघातात जखमी झाल्याचे सांगितले. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पत्नीच्या मृत्यूची माहिती मिळताच आरोपी रुग्णालयातून फरार झाला. नातेवाईक पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात हत्येचे भयानक सत्य समोर आले, ज्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याला अटक केली.

हे ही वाचा : बापाच्या रिसॉर्टवर बोलावून 17 वर्षीय मुलीवर नको तेच, धनिकपुत्राचं मोठं कांड

तीन महिन्यांची गरोदर

अंबिकापूर मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाचे डॉ. संतु बाग यांनी सांगितले की, मृत महिला तीन महिन्यांची गरोदर होती आणि तिच्या शरीरावर सुमारे 17 गंभीर बाह्य जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. मृत महिलेच्या खाजगी भागातून सुमारे 10 इंच लांब लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले असून, ते तपासासाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या निर्घृण घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.