Crime News : उत्तर प्रदेशातील बालाघाटमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिल्हा पंचायतीच्या नोकरीचे आमिष दाखवून महिलेला लाखो रुपयांची फसवणूक केली आणि तिला एका हॉटेलवर बोलावून तिची अब्रू लुटली. या प्रकरणी न्यायालयाने नराधमाला शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपीची ओळख अंतीश्र्वर मस्कारे (वय 33) याला पाच वर्षांची कारावास आणि 1 लाख रुपये दांडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं, आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर; तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात
नराधमाने जिल्हा पंचायतीत नोकरीसाठी असल्याचे भासवले
संबंधित प्रकरणात फिर्याद दाखल केल्यानुसार, पीडितेनं पॉलिटेक्निकचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 2024 मध्ये तरुणी ही आरोपीला भेटली होती, त्याने तिला आपण जिल्हा पंचायतीत नोकरीसाठी असल्याचे भासवले. नंतर तिला कॉम्प्युटर ऑपरेटर नोकरीचे आमिष दाखवले.
नोकरीचे आमिष दाखवून 1.28 लाख रुपये उकळले आणि हॉटेलच्या बंद दाराआड...
यासाठी त्याने तरुणीकडून तब्बल 1.28 लाख रुपये उकळण्याचे काम केले होते. नोव्हेंबर 2024 मध्ये हे प्रकरण अगदीच विकोपाला गेले, या प्रकरणी आरोपीने प्रशिक्षणाच्या नावाखाली तिला भोपाळला बोलावले आणि एका हॉटेलच्या बंद दाराआड कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडितेनं अनेकदा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अशावेळी नराधमाने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या प्रकरणी पीडितेनं धाडस दाखवत 22 नोव्हेंबर 2024 रोजी महिला पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : 'शांती, विश्वास, एकाकी प्रेम..' रुममध्ये नग्नावस्थेत सापडला मृतदेह, मृत्यूआधी पूजानं भिंतीवर काय लिहिलं?
अशातच पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावली. पुरावे आणि साक्षीदाराच्या आधारे, आरोपी अंतीश्र्वरच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
ADVERTISEMENT











