भावाच्या सासरी जाऊन करायचा नको ते, लग्नाच्या आदल्या रात्रीच तरुणाला अटक

घरात लग्नाची तयारी आणि संगीत सुरू असताना, पोलिसांनी बुधवारी (5 मे) रात्री उशिरा नवरदेवाला त्याच्या घरातून अटक केली. या तरुणावर त्याच्या भावाच्या मेहुणीवर लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:52 PM • 07 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

भावाच्या सासरी जाऊन करायचा नको ते

point

लग्नाच्या आदल्या रात्रीच तरुणाला अटक

Crime News : ज्या तरुणाचं गुरुवारी (6 मे) लग्न होणार होतं, त्याला पोलिसांनी लग्नाच्या आदल्या रात्री अटक केली. घरात लग्नाची तयारी आणि संगीत सुरू असताना, पोलिसांनी बुधवारी (5 मे) रात्री उशिरा नवरदेवाला त्याच्या घरातून अटक केली. हे प्रकरण बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील आहे. या तरुणावर एका 17 वर्षीय तरुणीने लग्नाचे वचन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. धक्क्दायक म्हणजे तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून तिच्या सख्ख्या बहिणीचा दीरच आहे.

हे वाचलं का?

'तेव्हा तो माझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचा'

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजाराम पासवान हा तिच्या मोठ्या बहिणीचा दीर आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो जेव्हा-जेव्हा भावाच्या सासरी जायचा, तेव्हा लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. याच काळात राजारामने पीडितेसोबत एका मंदिरात लग्नही केले. या लग्नावेळचा फोटो आणि व्हिडिओ पीडितेकडे आहे. यानंतर जेव्हा-जेव्हा पीडितेने धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी विचारले, तेव्हा-तेव्हा राजारामने तिचा प्रस्ताव धुडकावून लावला.

हे ही वाचा : नागपूर : कॉलेजमधील वासनांध तरुण, सावत्र आईच्या बेडरुममध्ये जायचा; प्रेग्नंट राहिली अन्...

लग्नाच्या आदल्या दिवशीच अटक

या काळात, दोन्ही कुटुंबांमधील चांगल्या संबंधांमुळे पीडित महिला गप्प राहिली. मात्र, जेव्हा तिला कळले की त्या तरुणाचे लग्न दुसऱ्या महिलेशी ठरले असून 7 मे रोजी लग्न होणार आहे, तेव्हा तिने धाडस करून महिला पोलीस ठाण्यात जाऊन बुधवारी एफआयआर दाखल केला. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच रात्री आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. यामुळे घरातील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले. पोलिसांच्या कारवाईमुळे सगळ्यांनाच धक्का बसला.

हे ही वाचा : मुंबईची खबर : मासळी बाजारात मासे कापण्यावर BMC ने निर्बंध लादले का? रितू तावडेंनी काय सांगितलं?

परिसरात रंगली चर्चा

इतकेच नव्हे तर, लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी आलेले अनेक नातेवाईक घरी परत जाऊ लागले. महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, आरोपीच्या अटकेनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.