नागपूर : कॉलेजमधील वासनांध तरुण, सावत्र आईच्या बेडरुममध्ये जायचा; प्रेग्नंट राहिली अन्...

योगेश पांडे

Nagpur Crime : नागपूरमध्ये एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने आपल्या सावत्र आईवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पीडित महिला चार महिन्यांची गर्भवती आहे.

ADVERTISEMENT

Nagpur Crime News
Nagpur Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : कॉलेजमधील वासनांध तरुण

point

सावत्र आईच्या बेडरुममध्ये जायचा; प्रेग्नंट राहिली अन्...

Nagpur Crime : आई आणि मुलाचं नातं अतिशय पवित्र असतं. अगदी सावत्र आई असली तरी अनेकदा पोटच्या लेकरांना मुलांप्रमाणे सांभाळत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. मात्र, नागपूर शहरात माय-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाने आपल्याच 26 वर्षीय सावत्र आईवर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या अमानवी कृत्यामुळे पीडित महिला सध्या चार महिन्यांची गर्भवती असून, आरोपीने वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एका नामांकित महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्याच नात्यातील पावित्र्य विसरून हे कृत्य केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या घटनेने संपूर्ण नागपूर शहर हादरून गेले आहे.

हेही वाचा : एकदाच गेली मैत्रिणीच्या घरी अन् पदरी आलं गरोदरपण, नेमकी घटना काय?

नोकरीचे आमिष आणि लग्नानंतर सतत अत्याचार 

पीडित महिलेच्या माहितीनुसार, 2024 मध्ये तिची ओळख विकास श्रीवास्तव नावाच्या 55 वर्षीय व्यक्तीशी झाली होती, जो एका खासगी बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. विकासने तिला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांनी मंदिरात लग्न केले. विकासला पहिल्या पत्नीपासून अक्षत नावाचा मुलगा आहे, जो सध्या 21 वर्षांचा असून शिक्षणाचे धडे गिरवत आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतर पती-पत्नीमध्ये घरगुती वादाला सुरुवात झाली होती, ज्याची नोंद पोलिसातही झाली होती. नोव्हेंबर 2025 आणि त्यानंतर 10 एप्रिल 2026 रोजी पीडिता घरात एकटी असताना अक्षतने तिच्या खोलीत घुसून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिच्यावर अत्याचार केला.

हेही वाचा : 219 कॉल्स अन् दगडाने ठेचून हत्या, वहिनीच्या प्रेमात दीर आकंठ बुडाला, कुणाचा झाला शेवट?

बदनामीच्या भीतीने पतीचा मौन पाळण्याचा सल्ला

अक्षतने केलेल्या या क्रूर कृत्याची माहिती जेव्हा पीडितेने आपल्या पतीला म्हणजेच विकास श्रीवास्तवला दिली, तेव्हा त्यांच्याकडून मिळालेली प्रतिक्रिया अधिक धक्कादायक होती. आपल्या पत्नीला न्याय मिळवून देण्याऐवजी पतीने तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. या प्रकरणामुळे समाजात कुटुंबाची बदनामी होईल आणि मुलाचे भविष्य उद्ध्वस्त होईल, असे सांगून पतीने तिला ही बाब दाबून ठेवण्यास सांगितले. पतीच्या या असंवेदनशील भूमिकेमुळे आणि स्वतःवर झालेल्या अन्यायामुळे पीडित महिला खचून न जाता तिने हिंमत एकवटली आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाऱ्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.

मानकापूर पोलिसात गुन्हा दाखल; आरोपी पुत्राचा शोध सुरू

अखेर पीडित महिलेने मानकापूर पोलीस ठाणे गाठून आपल्या सावत्र मुलाच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत मानकापूर पोलिसांनी आरोपी अक्षत श्रीवास्तव याच्या विरोधात बलात्काराच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या फरार आरोपी अक्षतचा शोध घेत आहेत. एका सुशिक्षित घरातील आणि जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीच्या मुलाने अशा प्रकारचे नीच कृत्य केल्याने पोलीस प्रशासनही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे. 

हे वाचलं का?