एकदाच गेली मैत्रिणीच्या घरी अन् पदरी आलं गरोदरपण, नेमकी घटना काय?
एका अल्पवयीन मुलीवर गेल्या अनेक महिन्यांपासून अत्याचार करण्यात आला असून, पीडिता आता गर्भवती राहिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीनेच तिचा विश्वासघात करून तिला नराधमांच्या तावडीत दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकदाच गेली मैत्रिणीच्या घरी अन् पदरी आलं गरोदरपण
नेमकी घटना काय?
Crime News : बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील लालगंज परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर गेल्या अनेक महिन्यांपासून अत्याचार करण्यात आला असून, पीडिता आता गर्भवती राहिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीनेच तिचा विश्वासघात करून तिला नराधमांच्या तावडीत दिले. सामाजिक स्तरावर न्याय न मिळाल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली, मात्र तक्रार नोंदवूनही मुख्य आरोपी अद्याप मोकाट असल्याने संताप व्यक्त होत आहे.
'घरात एकटीच आहे'
या घटनेची भीषणता पीडितेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. काही महिन्यांपूर्वी पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीने 'घरात एकटीच आहे' असे सांगून तिला झोपण्यासाठी आपल्या घरी नेले होते. पीडितेने सुरुवातीला नकार दिला होता, मात्र मैत्रिणीच्या आग्रहाखातर ती गेली. तिथे पोहोचल्यानंतर मैत्रिणीने जवळच्याच दोन तरुणांना बोलावून घेतले. त्यानंतर पीडितेला दुधातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर आपल्याला फसवले गेल्याचे पीडितेच्या लक्षात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
हे ही वाचा : 219 कॉल्स अन् दगडाने ठेचून हत्या, वहिनीच्या प्रेमात दीर झाला वेडा, कुणाचा झाला शेवट?
शारीरिक संबंधांसाठी दबाव
या प्रसंगानंतर आरोपी तरुण आणि संबंधित मैत्रिणीने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला जात होता. बदनामीच्या भीतीने पीडितेने ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र, दोन महिन्यांनंतर प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने पीडितेने आईसोबत रुग्णालय गाठले. तिथे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले, ज्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. पीडितेने रडत रडत आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग घरच्यांना सांगितला.
हे ही वाचा : पोलीस शिपाई महिलेच्या दुकानात सारखं जायचा, शेवटी सगळा डाव अंगलट आला, नेमकं काय घडलं?
लग्नाचे आश्वासन देऊन केली फसवणूक
पीडितेच्या कुटुंबाने सुरुवातीला सामाजिक स्तरावर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीच्या कुटुंबीयांनी लग्नाचे खोटे आश्वासन देऊन वेळ मारून नेली. वारंवार फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने लालगंज पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही पोलीस ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आरोपी उजळ माथ्याने फिरत असून पीडितेला मात्र न्यायासाठी वनवन करावी लागत आहे. आता या प्रकरणात पोलीस वरिष्ठ पातळीवरून काय दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









