बायकोने हात धरले, प्रियकराने घोटला गळा अन् नंतर...निवृत्त लष्करी जवानाला कसे संपवले?

निवृत्त लष्करी जवानाची हत्या झाली आहे. जवानाच्या बायकोने आणि तिच्या प्रियकराने मिळून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 08:40 AM • 07 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायकोने हात धरले

point

प्रियकराने घोटला गळा अन् नंतर...

point

निवृत्त लष्करी जवानाला कसे संपवले?

Crime News : राजस्थानमधील कोटा येथे नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. निवृत्त लष्करी जवान मनोज शर्मा यांची त्यांची पत्नी दीपिका हिने आपल्या प्रियकरासोबत मिळून गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत पत्नी दीपिका, तिचा प्रियकर देवेश आणि त्याचा सहकारी विष्णू या तिघांना अटक केली आहे. कौटुंबिक कलह आणि अनैतिक संबंधांतून हा कट रचण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हे वाचलं का?

'असा' रचला कट

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी 30 एप्रिल रोजी रात्री दीपिकाने देवेशला फोन करून घरी बोलावले होते. देवेश आपल्या एका मित्रासह तिथे पोहोचला आणि त्यानंतर तिघांनी मिळून मद्यप्राशन केले. पूर्वनियोजित कटानुसार, संधी मिळताच त्यांनी मनोज यांचा गळा आवळून त्यांचा जीव घेतला. ही हत्या नसून नैसर्गिक मृत्यू वाटावा, यासाठी आरोपींनी मृतदेह पलंगावर झोपवून ठेवला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, शुक्रवारी सकाळी आरोपींनी घाईघाईने अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली होती.

हे ही वाचा : मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या सुवेंदू अधिकारींच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीची हत्या, डोक्यातच झाडल्या गोळ्या

शेजाऱ्यांना आली शंका

मात्र, घरात कोणाचाही रडण्याचा आवाज न येणे आणि संशयास्पद हालचालींमुळे शेजाऱ्यांना शंका आली. आरोपी जेव्हा मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची तयारी करत होते, तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांना रोखले आणि मनोज यांच्या वडिलांना माहिती दिली. वडिलांनी आल्यावर जेव्हा मृतदेहावरील चादर हटवली, तेव्हा मनोज यांच्या गळ्यावर जखमेच्या खुणा दिसल्या. यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, वैद्यकीय मंडळाने केलेल्या पोस्ट मार्टमनंतर ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा : तरुणीने घटाघटा संपवली बीअर, बुटं द्या अन् बीअर घ्या... या बारमधील 'ही पैज' म्हणजे भलताच विषय!

चार वर्षांपासूनचे प्रेमसंबंध

मनोज शर्मा हे निवृत्त सैनिक होते आणि त्यांच्या पत्नीचे गेल्या चार वर्षांपासून देवेशसोबत प्रेमसंबंध होते. मनोज कामासाठी घराबाहेर असताना देवेशचे घरी येणे-जाणे असायचे, मात्र मनोज परतल्यानंतर या संबंधांत अडथळा येत असल्याने हा हत्येचा कट रचण्यात आला. घटनेनंतर आरोपी पळून गेले होते, परंतु पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे करौली परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. सध्या पोलीस या प्रकरणातील अन्य पैलूंचा अधिक तपास करत आहेत.