तरुणीने घटाघटा संपवली बीअर, बुटं द्या अन् बीअर घ्या... या बारमधील 'ही पैज' म्हणजे भलताच विषय!

मुंबई तक

Beer Viral Video: इंटरनेटवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यात एक अनोखे चॅलेंज दाखवण्यात आले आहे. बुटाच्या बदल्यात बीअरचा मग दिला जातो. पण तो बीअर मग इतका विचित्र आहे की तो टेबलावर ठेवणेही अवघड आहे.

ADVERTISEMENT

viral video young woman chugs down beer in one go give me your shoes take beer this bet at bar is quite sensation
Beer Viral Video
google news

बेल्जियम: सोशल मीडिया सतत अशा नवीन गोष्टींनी भरलेले असते, ज्या आपण यापूर्वी कधीही पाहिल्या किंवा अनुभवल्या नाहीत. परदेशात प्रवास करणाऱ्या एका भारतीय महिलेने तिच्या व्हिडिओमध्ये असेच काहीतरी चित्रित केले आहे, ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

@chahat_anand या हँडलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "मी तो ग्लास टेबलावर ठेवूही शकले नाही आणि मधून तो जड ग्लास बाहेर काढणेही अवघड होते. बेल्जियममधील घेंट येथे मला एक खूप मजेशीर अनुभव आला."

नेमकं काय घडलं?

व्हिडिओमध्ये बेल्जियममधील एका बारमध्ये एक भारतीय महिला बसलेली दिसत आहे. बारमधील एक कर्मचारी आत येतो, तिचा एक बूट घेतो आणि नंतर तिला एका मोठ्या बीकरसारख्या मगमध्ये बीअर आणून देतो.

हे ही वाचा>> 37 वर्षीय घटस्फोटित पुरुषाला लग्नासाठी व्हर्जिन तरुणी हवी, मध्यस्ती करणाऱ्या महिलेनं सांगितला घटनाक्रम, Video व्हायरल

या बीकरचा तळ वक्र आहे. यामुळे ते टेबलवर ठेवणे अवघड होते. बिअर पिताना चुकून ते टेबलवर ठेवण्याचा प्रयत्न केल्यास, तो खाली पडू शकतो. या अनोख्या बिअर मगमध्ये 1.2 लिटर बिअर मावत होती.

हे वाचलं का?