Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका हुक्का बारमध्ये काही मुलं आणि मुली आक्षेपार्ह परिस्थितीत दिसत असल्याची माहिती समोर आली. एका व्हिडिओत त्यांचे कपडे विस्कळीत पडलेले दिसत आहेत. या व्हिडिओचा चुकीच्या पद्धतीने अपप्रचार केला जात होता. त्या व्हिडिओची पोलखोल प्रसारमाध्यमाने केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर केलं आंदोलन, पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाले, "हे लोक तंबाखू मळून..."
अनिक सिंग नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यावर लिहिलं की, लखनऊत झालेल्या एका हुक्काबारवर टाकण्यात आलेल्या छाप्यात एकूण 30 जणांना पकडण्यात आले. त्यात 15 मुली होत्या. संबंधित मुली प्रतिष्ठीत कुटुंबातील असून सर्व मुलं ही मुस्लिम समाजातील असल्याचं संबंधित पोस्टमध्ये नमूद केलं होतं. याच व्हिडिओबाबत सत्य समोर आलं आहे. याचं सत्य इंडिया टुडे या प्रसारमाध्यमाने पोलखोल करत बाहेर आणलं असल्याचं बोललं जात आहे.
व्हिडिओची केली पोलखोल
संबंधित प्रकरणात आता लखनऊ पोलिसांनी माहिती दिली की, तुम्हाला अनिका सिंगसारखे अनेक इंस्टाग्राम युजर्स आढळून येतील असा पोलिसांनी दावा केला. संबंधित मुली या हिंदू आहेत, तर मुले मुस्लिम आहेत. अशा स्थितीत व्हिडिओची चौकशी करताना, प्रथमत: लखनऊ पोलिसांनी एक्स हँडल शोधलं. त्यानंतर हा व्हिडिओ खोटा असल्याची पोलखोल केली.
दरम्यान, हुक्काबारवर पकडण्यात आलेल्या एकूण 30 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एकूण 15 मुलं आणि 15 मुलींचा समावेश होता. यामध्ये हे सांगावं लागेल की, सदर व्हिडिओचा लखनऊशी काहीही एक संबंंध नाही.
हेही वाचा : ग्रहण दोष योग लागू झाल्याने 'या' राशीतील लोकांना आर्थिक चणचण भासेल, तुमच्याही राशीचा समावेश आहे का?
संबंधित बातमीची इंडिया डुटे या प्रसारमाध्यमाने फॅक्ट चेक केलं आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचा लव्ह जिहादच्या नावाखाली शेअर करण्यात आला होता. यावेळी, तो शेअर करताना काही लोकांनी मध्यप्रदेशातील व्हिडिओ असल्याचं सांगितलं आणि अपप्रचार केला.
ADVERTISEMENT
