Extra Marital Affair Shocking News : उत्तराखंडच्या हरिद्वार येथून खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेनं तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. महिलेला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं, पण पती तिच्या प्रेम संबंधात अडथळा ठरत होता. मृत व्यक्ती महिलेचा दुसरा पती होता. पहिल्या पतीचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं होतं. तिला तिसरं लग्न करायचं होतं. म्हणून तिने पतीच्या हत्येचा कट रचला. ही धक्कादायक घटना पथरी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पोलिसांनी ई-रिक्षा चालकाची हत्या करणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. या दोघांनी रिक्षा चालकाचा गळा दाबून हत्या केली आणि नंतर मृतदेह बागेत फेकला, असा आरोप आहे.
ADVERTISEMENT
आंब्याच्या बागेत मिळाला मृतदेह
पथरी पोलिसांनी म्हटलंय की, 14 जुलै रोजी पथरी परिसरातील किशनपूर गावात असलेल्या एका आंब्याच्या बागेत मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. रिक्षा चालक प्रदीप (48) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो अंबुवाला येथील रहिवासी होता. प्रदीप कुमारचा भाचा मांगेरामने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
हे ही वाचा >> 'हे सगळे आमदार माजले.. असं लोकं बोलतायेत', CM फडणवीस विधानसभेत एवढे का संतापले?
पहिल्या पतीचाही झाला होता मृत्यू
एसएसपी प्रमेंद्र सिंह डोबाल यांनी हत्या प्रकरणाचा तातडीनं छडा लावण्याचे पोलिसांना निर्देश दिले होते. त्यानंतर पोलिसांच्या टीमने सीडीआर तपासलं. पोलीस तपासात उघडकीस आलं की, आरोपी महिलेच्या पहिल्या पतीचा आजारामुळे मृत्यू झाला होता. महिलेनं दहा वर्षांपूर्वी प्रदीप कुमारशी लग्न केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी महिलेनं गावातील एका व्यक्तीसोबत अफेअर सुरु केलं.
पोलीस तपासात असंही समोर आलं की, घटनेच्या दिवसापासूनच सलेखचा मोबाईल नंबर बंद आहे आणि तो गावातून फरार झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रदिपच्या पत्नीला रीनाला अटक केली. आरोपी महिलेकडे कसून चौकशी केल्यानंतर उघडकीस आलं की, तिचे अनैतिक संबंध सुरु होते. हत्येचा कट रचून प्रदिपची हत्या केल्याचीही कबुली महिलेनं पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सलखेलाही अटक केली.
हे ही वाचा >> मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, 'कारण आलं समोर, नेमकं घडलं काय?
ADVERTISEMENT
