मुलीने पाहिले आईचे 'ते' कारनामे! ठार मारून बेडमध्ये टाकलं आणि मृतदेह काढून परफ्यूम...

उत्तर प्रदेशात एका महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची मन हेलावून टाकणार घटना घडली. मुलीने आपल्या आईचे असे काही कारनामे पाहिले, ज्यामुळे महिलेनं तिची हत्या केल्याचा खुलासा करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय?

मुलीने पाहिले आईचे 'ते' कारनामे! ठार मारून बेडमध्ये टाकलं आणि...

मुलीने पाहिले आईचे 'ते' कारनामे! ठार मारून बेडमध्ये टाकलं आणि...

मुंबई तक

• 11:39 AM • 17 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीने पाहिलं आपल्याच आईला आक्षेपार्ह स्थितीत

point

आईने 6 वर्षांच्या मुलीची केली हत्या आणि मृतदेह बेडमध्ये टाकून...

Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची मन हेलावून टाकणार घटना घडली. मुलीने आपल्या आईचे असे काही कारनामे पाहिले, ज्यामुळे महिलेनं तिची हत्या केल्याचा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांना सुद्धा या प्रकरणात उघडकीस आलेल्या बाबीमुळे मोठा धक्का बसला आहे. नेमकं प्रकरण काय? 

हे वाचलं का?

मुलीला केली मारहाण अन् नंतर हत्या 

खरंतर, 6 वर्षांच्या सायनारा उर्फ सोनीने तिची आई रोशनीला तिच्या प्रियकराशी शारीरिक संबंध बनवताना पाहिले होते. महिला पती घरी नसताना प्रियकरासोबत संबंध बनवायची आणि हेच तिच्या मुलीने पाहिले. त्यावेळी सोनी आपल्या आईला म्हणाली, "मी पप्पांना हे सगळं सांगेन." त्यावेळी महिलेने आपल्या मुलीला आधी शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलगी ऐकत नसल्यामुळे महिलेने अगदी क्रूरपणे मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली आणि यामध्ये तिला तिच्या प्रियकराची साथ होती. खून केल्यानंतर त्या दोघांनी मुलीचा मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला. 

त्यानंतर रोशनी आणि तिचा प्रियकर उदित जायसवालने त्याच बेडवर पार्टी केली आणि ड्रिग्ज सुद्धा घेतले. जेव्हा मृतदेहातून दुर्गंध येऊ लागला तेव्हा तिने तो बाहेर काढला आणि एसीजवळ ठेवला. त्यानंतर त्यावर भरपूर परफ्यूम स्प्रे केला आणि फरशी डिटर्जेंटने धुतली. एवढ्यावर ती थांबली नाही. तिने आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप पतीवर टाकण्याचा प्लॅन बनवला. 

पोलिसांच्या तपासात झाला खुलासा 

रोशनीने पोलिसांना फोन केला आणि आपला पती मुलीची हत्या करून पळून गेल्याचं तिने सांगितलं. पण तिचं हे खोटं फार काळ लपून राहिलं नाही. पोलिसांनी मृतदेह पाहिल्यानंतर तो जुना म्हणजेच मुलीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर मुलीची 36 तासांपूर्वी हत्या झाल्याचा पोस्टमॉर्टमध्ये खुलासा करण्यात आला. यामुळे पोलिसांच्या मनात वेगळाच संशय आला.

हे ही वाचा:  विकृतीची परिसीमा! लग्नाचं आमिष दाखवून मुलीवर केलं लैंगिक शोषण, नंतर सोशल मीडियावर फोटो केले शेअर

पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले. त्यांना शाहरुखची माहिती मिळाली. त्यावरून मुलीची हत्या झाली तेव्हा शाहरुख त्याच्या बहिणीच्या घरी असल्याचं उघडकीस आलं. चौथ्या मजल्यावर मुलाचा खून करण्यात आला आणि त्यावेळी शाहरुख तिथे गेलाच नव्हता. त्यानंतर पोलिसांनी रोशनी आणि तिचा प्रियकर उदितला पकडले.

प्रियकराने सगळं कबूल केलं

पोलिसांच्या चौकशीदरम्यान रोशनीचा प्रियकर उदितने सगळ्याचा खुलासा केला. तो म्हणाला, "रोशनीनेच तिच्या मुलीची हत्या केली आणि यामध्ये मी तिची साथ दिली. शनिवारी रात्री सोनीने आम्हाला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. त्यावेळी ती तिच्या वडिलांना याबद्दल सांगणार होती. मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकत नव्हती. यामुळे रागात येऊन रोशनीने तिला मारहाण केली आणि सोनी जोरात ओरडू लागली. तेव्हा रोशनीने तिचा गळा दाबून तिची हत्या केली. मग मृतदेह बेडच्या बॉक्समध्ये ठेवला. आम्ही दोघांनी तिथेच, त्याच खोलीत दारूची पार्टी केली. मृतदेहातून दुर्गंध येऊ लागल्यास तो बाहेर काढून एसीजवळ ठेवला आणि त्यावर परफ्यूम स्प्रे केला." त्यावेळी दोघांनीही ड्रग्ज घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

हे ही वाचा: बऱ्याचदा शरीर संबंध ठेवले अन् प्रियकराला विचारला एक प्रश्न... उत्तर ऐकून बसला मोठा धक्का, नेमकं काय केलं?

पतीला अडकवण्याचं प्लॅनिंग

पुढे उदित म्हणाला, "त्याच रात्री आम्ही या प्रकरणात शाहरुखला अडकवण्याचा प्लॅन बनवला." पोलिसांना फोन करून रोशनीच्या पतीने म्हणजेच शाहरुखने सोनीची हत्या केल्याचं त्यांना सांगण्यात आलं. पोलिसांनी केलेल्या तपासात, सोनीची हत्या चौथ्या मजल्यावर करण्यात आली असून त्यावेळी शाहरुख तिथे नसल्याचं उघडकीस आलं. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तसेच, खोट्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या रोशनीचा दिर सलमान, सासू परवीन आणि दोन्ही नणंदांना सोमवारीच जामीन मंजूर करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

    follow whatsapp