Pune Crime News : हडपसर-सासवड रोडलगत दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकी परिसरात एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. 30 ते 40 वर्षे वयोगटातील ही महिला आहे. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. प्रकाश विभीषण माने (वय 29) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो वडकी नाला (ता. हवेली, जि. पुणे) येथे राहणारा आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : डोंबिवलीतील प्रगती कॉलेज हादरले! शिपायाने चौथ्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन, प्राचार्यांच्या केबिनमध्ये काय घडलं?
काची कंपनीजवळ आढळला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 एप्रिलच्या रात्री हडपसर–सासवड रोडलगत दिवे घाट पायथ्याशी काची कंपनीजवळील मोकळ्या जागेत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करून परिसरातील माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान प्रकाश माने याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
हे ही वाचा : पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास आता सुसाट, ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा, किती कोटी खर्च होणार?
शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न
सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने संबंधित महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिलेने त्याला प्रतिकार केला. त्यामुळे संतापाच्या भरात आरोपीने तिचा गळा दाबला आणि डोक्यात दगड मारून तिचा खून केला, असे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT











