वडील शौचाला जाऊन परत येईपर्यंत मुलीचं अपहरण, शेजारच्याच घरात 12 वर्षाची मुलगी नग्नावस्थेत सापडली, धक्कादायक प्रकरण

मुंबई तक

• 01:05 PM • 07 Mar 2026

Crime News : एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी तिच्या वडिलांना शेजारच्याच घरात नग्नावस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वडील शौचाला जाऊन परत येईपर्यंत मुलीचं अपहरण

point

शेजारच्याच घरात 12 वर्षाची मुलगी नग्नावस्थेत सापडली

point

धक्कादायक प्रकरण

Crime News : एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी तिच्या वडिलांना शेजारच्याच घरात नग्नावस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : औषध न घेतल्याने पेशंटची हत्या, वॉर्डबॉयसह चौघे ताब्यात; नेमकं काय घडलं?

मुलगी शेजारच्या घरात विवस्त्र आढळली

ही घटना जरीफनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ते शौचास गेले होते, त्यावेळी त्यांची मुलगी घरात एकटीच होती. जेव्हा ते परतले, तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाची कडी तुटलेली दिसली आणि मुलगी घरातून बेपत्ता होती. त्यांनी तातडीने शोध सुरू केला असता, मुलगी शेजारच्या एका घरात विवस्त्र अवस्थेत आढळून आली.

अपहरण करुन सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीला घरातून पळवून नेले आणि एका ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. नराधमांनी मुलीचे हात-पाय बांधले होते आणि ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडला होता. मुलीने आरडाओरडा करू नये म्हणून तिला अत्यंत क्रूरपणे डांबून ठेवण्यात आले होते. या घटनेने पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब प्रचंड हादरले आहे.

हे ही वाचा : तू जास्त मोठा झाला का? आत्ता तुला बघतो.. कल्याणमध्ये कुख्यात गुंड पीडीकडून रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडे धाव

पीडितेच्या कुटुंबाने वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाईला वेग दिला. जरीफनगर पोलिसांनी शुक्रवारी शिवा, बॉबी, रामा आणि भोला या चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. सध्या हे चारही आरोपी घर सोडून पळून गेले असून पोलीस त्यांच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.