Crime News : माणूस किती क्रूर वागू शकतो याविषयीच्या घटना आपण रोज वाचत, ऐकत असतो. अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा खून करुन त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आले. हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. काही गावकऱ्यांना हे तुकडे आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांनां बोलावले. पोलिसांना पाच तुकडे सापडले असून अद्याप त्या तरुणाचे धड न सापडल्याने पोलिसदेखील चिंतेत आहेत. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एका गावात घडलेली ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे : दिवेघाट पायथ्याशी आढळला महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह, शारीरिक संबंधाला प्रतिकार केल्याने हत्या
मक्याच्या शेतात मृतदेहाचे तुकडे
आज (7 मार्च) सकाळी जेव्हा ग्रामस्थ आमापूर दियारा येथील शेताकडे गेले, तेव्हा तिथले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मक्याच्या शेतात आणि आसपासच्या परिसरात मानवी शरीराचे अवयव विखुरलेले पडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अजित कुमार तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी झाडाझुडपांतून आणि मक्याच्या शेतातून मृतदेहाचे चार भाग गोळा केले, तर पाचवा भाग 50 मीटर दूर असलेल्या एका जलाशयात तरंगताना आढळून आला.
धड गायब असल्याने अडचणी
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भागलपूर येथून फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीनुसार, या तरुणाची हत्या सुमारे तीन दिवसांपूर्वीच करण्यात आली असावी. पुराव्यांची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आहेत. मृतदेहाचे धड गायब असल्याने अद्याप मृताची ओळख पटू शकलेली नाही, ज्यामुळे तपासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
हे ही वाचा : नवरा बायको दोघंही दारु प्यायले, दिवसभर नशेत अन् संध्याकाळी मोठं कांड; मुलानं गाठलं पोलिस स्टेशन
घड्याळावरुन ओळख पटवण्याचा प्रयत्न
पोलीस ठाण्याचे प्रभारी अजित कुमार यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हा नियोजित हत्येचा कट असल्याचे दिसून येते. मृतदेहाचे सर्व अवयव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून पोलीस आसपासच्या परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची दखल घेत आहेत. तसेच घटनास्थळावर सापडलेल्या हातात असलेल्या घड्याळावरुन त्याची ओळख पटवण्याची प्रयत्न पोलिस करत आहेत. या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून सुरक्षा व्यवस्थेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT











