नवरा बायको दोघंही दारु प्यायले, दिवसभर नशेत अन् संध्याकाळी मोठं कांड; मुलानं गाठलं पोलिस स्टेशन

मुंबई तक

• 10:14 AM • 07 Mar 2026

Crime News : नवऱ्याने आपल्या बायकोची साडीने गळा आवळून हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे दोघंही दारुच्या नशेत होते. नशेत असतानाचा दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून नवरा संतापला आणि त्याने आपल्या बायकोची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवरा बायको दोघंही दारु प्यायले,

point

दिवसभर नशेत अन् संध्याकाळी मोठं कांड

point

मुलानं गाठलं पोलिस स्टेशन

Crime News : नवऱ्याने आपल्या बायकोची साडीने गळा आवळून हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे दोघंही दारुच्या नशेत होते. नशेत असतानाचा दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून नवरा संतापला आणि त्याने आपल्या बायकोची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली आहे. राजू पेंटर असं या आरोपी पतीचं नाव आहे. छत्तीसगडमधील मनेंद्रगड परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : तू जास्त मोठा झाला का? आत्ता तुला बघतो.. कल्याणमध्ये कुख्यात गुंड पीडीकडून रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

नवरा बायको दोघंही नशेत

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजू पेंटर आणि त्याची पत्नी सुब्रतिया हे दोघेही गुरुवारी सकाळपासून दारूच्या नशेत होते. दिवसभर त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद सुरू होता. सायंकाळच्या सुमारास घराजवळील विहिरीपाशी त्यांच्यातील भांडण पुन्हा विकोपाला गेले. संतापलेल्या राजू पेंटरने रागाच्या भरात सुब्रतियाचा साडीने गळा आवळला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळीच बसून राहिला.

मुलाने दाखल केली तक्रार

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मृत महिलेचा मुलगा मुकेश सिंह याने पोलिसांना दिली. मुकेशने तातडीने पोलीस ठाणे गाठून आपल्या वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली. माहिती मिळताच मनेंद्रगड कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी आरोपी पती राजू पेंटरला ताब्यात घेतले असून मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमॉर्टम पाठवला आहे.

हे ही वाचा : UPSC CSE: महाराष्ट्रातून 'एवढ्या' जणांनी मारली यूपीएससीमध्ये बाजी, पाहा निकालाची संपूर्ण यादी

पोलिस तपास काय सांगतो?

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात पती-पत्नी दोघांनाही दारूचे व्यसन असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत असत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून त्यांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून, हत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.