लग्नात हुंड्यात गाडी दिली नाही, संतापलेल्या पतीने बायकोसह चार महिन्याच्या बाळावर केला अॅसिड हल्ला

मुंबई तक

• 03:38 PM • 07 Mar 2026

Crime News : हुंड्यात गाडी न मिळाल्याने संतापलेल्या नवऱ्याने अॅसिडने हल्ला केला. या धक्कादायक घटनेत पत्नी आणिी त्यांची चार महिन्यांची मुलगी गंभीरपणे भाजली. तिला वाचवण्यासाठी आलेल्या तिच्या सासऱ्यांवरही अॅसिड पडलं, त्यात त्यांनाही भाजलं होतं. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेलं आहे. पीडिते पत्नीचे नाव योगिता अग्रवाल असे नाव आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लैंगिक अत्याचार आणि घरातील अॅसिडने हल्ला 

point

अॅसिडच्या हल्ल्यात योगिताचा डावा हात आणि मांडी भाजली

Crime News : हुंड्यात गाडी न मिळाल्याने संतापलेल्या नवऱ्याने अॅसिडने हल्ला केला. या धक्कादायक घटनेत पत्नी आणिी त्यांची चार महिन्यांची मुलगी गंभीरपणे भाजली. तिला वाचवण्यासाठी आलेल्या तिच्या सासऱ्यांवरही अॅसिड पडलं, त्यात त्यांनाही भाजलं होतं. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेलं आहे. पीडिते पत्नीचे नाव योगिता अग्रवाल असे नाव आहे. ती फेब्रुवारी 2024 मध्ये ग्वाल्हेरच्या लोहिया बाजार येथील रहिवासी आहे. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडल्याचे वृत्त आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, पीडितेनं भीतीने धावत्या कारमधून मारली उडी, जंगलात घालवली रात्र

लैंगिक अत्याचार आणि घरातील अॅसिडने हल्ला 

1 मार्च रोजी रात्री 9 च्या दरम्यान, आरोपी मनन अग्रवाल हा दारूच्या नशेत होता, त्याने योगितावर गाडीसाठी दबाव आणला होता. तिने प्रतिकार केला तेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि घरात साठवलेले अॅसिड तिच्यावर फेकले, त्यावेळी योगिताने तिच्या 4 महिन्यांच्या मुलीला हातात घेतले. 

अॅसिडच्या हल्ल्यात योगिताचा डावा हात आणि मांडी भाजली

अॅसिडच्या हल्ल्यात योगिताचा डावा हात आणि मांडी भाजून मुलीचा चेहरा आणि हातही भाजून निघाला होता. सासरे महेंद्र आग्रवाल आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आले असता, अॅसिडचे थेंब त्यांच्या शर्टवर पडले आणि त्याचा हात भाजून निघाला होता. 

हे ही वाचा : तरुणाच्या मृतदेहाचे पाच तुकडे अन् धड गायब, मक्याच्या शेतातलं 'ते' दृश्य बघून पोलिसही चक्रावले

दरम्यान, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर, योगिता आणि तिच्या मुलीला त्यांच्या पालकांनी डाबरा येथे नेले होते. मात्र, त्यापूर्वी तिने पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची तक्रार दाखल केली. कोतवाली पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि त्याचा शोध सुरु आहे.