भावाने बहिणीच्या घरातून 45 लाखांचे दागिने केले लंपास, खलनायक गाण्यावर नाचला

crime news : भावानेच आपल्याच बहिणीच्या घरात मित्राच्या मदतीने 45 लाख रुपयांचे सोने चांदीची चोरी केली. संबंधित प्रकरणाची ग्वाल्हेरमधील एका महिलेनं तक्रार दाखल केली. 45 लाखांच्या सोने चांदीसह दीड लाख रुपये मित्राच्या साथीने लंपास केले.

crime news

crime news

मुंबई तक

• 07:00 AM • 13 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बहिणीच्या घरात चोरी

point

मै नायक नही खलनायक हूँ..! गाण्यावर नाच 

Crime News : भावानेच आपल्याच बहिणीच्या घरात मित्राच्या मदतीने 45 लाख रुपयांचे सोने चांदीची चोरी केली. संबंधित प्रकरणाची ग्वाल्हेरमधील एका महिलेनं तक्रार दाखल केली. 45 लाखांच्या सोने चांदीसह दीड लाख रुपये मित्राच्या साथीने लंपास केले. हा धक्कादायक प्रकार ग्वालियरमध्ये घडला आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : गुरू - शिष्याच्या नात्याला काळिमा! शिक्षकाने 5 विद्यार्थिनींवर केले लैंगिक अत्याचार

बहिणीच्या घरात चोरी अन् मै नायक नही खलनायक हूँ..! गाण्यावर नाच 

नणंदेच्या घरी राहणारी गर्भवती पत्नीचा या प्रकरणात समावेश होता. जेव्हा नणंद घराबाहेर गेली तेव्हा ही चोरी केल्याची माहिती तिनं पोलिसांना दिली. या घटनेनंतर आरोपी तरुणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात त्याने मै नायक नही खलनायक हूँ..! या गाण्यावर डान्स केला. 

संबंधित प्रकरणात नवरा-बायको व्यतिरिक्त पोलिसांनी गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीला अटक केली. दरम्यान ग्वाल्हेर येथील रहिवासी असलेल्या मोनिका उर्फ रानू श्रीवास्तव यांनी 4 जून रोजी सायंकाळी पोलिसांना जाऊ घरी एकटीच असल्याची माहिती दिली. 

45 लाख रुपयांचे दागिने आणि दीड लाख रुपये लंपास

दरम्यान, दोन तरुण एसी सर्व्हिसच्या बहाण्याने घरात घुसले, त्यांनी वहिनीला बेदम मारहाण करून ओलीस ठेवले. कपाटाचे कुलूप देखील तोडण्यात आले होते, ज्यातून तब्बल 45 लाख रुपयांचे दागिने आणि दीड लाख रुपये लंपास केले. 

बहिणीच्या घरातील चोरीचा कबुलीनामा 

पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, दरोड्याच्या या प्रकरणात एक संशयित आढळून आला होता. मोनिकाचा भाऊ, शुभम श्रीवास्तव हा एक संशयित म्हणून समोर आला. पोलिसांना त्याला पकडून चौकशी केली, नंतर त्याने घटनेचा कबुलीनामा देत साथीदाराने त्याच्या बहिणीच्या घरात दरोडा घातल्याचे सांगितलं. 

हे ही वाचा : बायकोचा 'त्या' गोष्टीला नकार, नवऱ्याने थेट शेवटच केला, कुणाचा जीव गेला?

आरोपी हा काही महिन्यांपासून पत्नीसोबत बहिणीच्या घरी राहत होता. याच काळात बहीण मोनिका ही तिच्या कपाटाच रोकड आणि दागिने ठेवायची. आरोपीच्या पत्नीच्या लक्षात आले असता दोघांनी मिळून ती मालमत्ता बळकवण्याचा मोठा कट आखला.