गुंगीच्या पाच गोळ्या देत शेतात नेलं, 9-10 वर्षाच्या मुलीवर नको तेच..

crime news : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री 9 वाजता पीडित मुलगी बेशुद्धवस्थेत आढळून आली होती.

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:10 PM • 12 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पीडितेला गुंगीच्या पाच गोळ्या देऊन लैंगिक अत्याचाराचा आरोप

point

लहान काकाने अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा पीडितेचा आरोप

Crime News : एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री 9 वाजता पीडित मुलगी बेशुद्धवस्थेत आढळून आली होती. पीडित मुलीचं वय वर्षे 9-10 असल्याचे सांगण्यात येते. मुलगी घटनास्थळावरून ये-जा करणाऱ्यांना काका म्हणून हाक मारत होती. हा लज्जास्पद प्रकार हरियाणातील पानिपतमध्ये घडला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :  सोलापूर: मुख्याध्यापकाला 'तो' नाद नडला, आधी पत्नी व दोन मुलांना विष दिलं अन्..

बाईकवर असलेल्या दोन तरुणांनी गाडी थांबवली आणि तिला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची माहिती मिळाली असता, बाल कल्याण समिती आणि समुपदेशन पथकाने रुग्णालयात धाव घेतली. याचदरम्यान, मुलीने सांगितलं की, ती लहान असताना तिच्या आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. तिनं केलेल्या आरोपानुसार, गुरुवारी रात्री मोठ्या काकाने तिला एका निर्जनस्थळी फसवून शेतात नेले. 

पीडितेला गुंगीच्या पाच गोळ्या देऊन लैंगिक अत्याचाराचा आरोप

पीडितेनं आरोप केला की, गुंगीच्या पाच गोळ्या देण्यात आल्या, नंतर ती बेशुद्धवस्थेत पडली होती. शुद्धीवर आल्यावर ती रस्त्याच्या कडेला होती. तिचा आरोप असा की, तिला बेशुद्ध करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि नंतर तिला सोडून देण्यात आले होते. 

हे ही वाचा :  जालना: शिक्षकाकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 'तसले' फोटो व्हायरल..

लहान काकाने अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा पीडितेचा आरोप

 

मुलीनं आरोप केला की, तिच्यावर तिच्या काकाने याआधी देखील अश्लील कृत्य केले होते. तिच्या लहान काकाने तिला अनेकदा लैंगिक व्हिडिओ दाखवल्याचा आरोप करण्यात आला. पोलीस सध्या मुलीच्या पालकांविषयीची माहिती गोळा करत आहेत. मुलगी सध्या आयसीयूमध्ये असल्याचे सांगण्यात येते.