Crime News : वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने तरुणाने मित्राच्याच मुलीला हॉटेलवर नेत लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीचं वय वर्षे 7 होते. आरोपीला पोलिसांनी जेव्हा घेरलं तेव्हा मुलीला तिच्या घरात सोडून पळ काढला. पोलिसांनी शोध घेताना त्याचा पाठलाग केला होता. आरोपीने नंतर पोलिसांवर गोळीबार केला. गोळीबारानंतर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील गोळीबार केला, ज्यात त्याच्या पायाला गोळी लागली, संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये घडला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 3 मुलांच्या आईला लग्नाची मागणी केली, नंतर शरीरसंबंध ठेवत..
हे प्रकरण गोरखपूरच्या गोला बाजारामधील हरपूर गावातील रहिवासी असलेल्या संजय मिश्रा सध्या टिळक नगरमधील लाकून गिरणीजवळच्या मंदिर रस्त्यावरील एका भाडेतत्त्वाच्या घरात राहत होता. तो एका कंपनीत काम करतो आणि त्याच्यासोबत आणखी एक कर्मचारी राहतो.
मित्रानेच मित्राच्या 7 वर्षाच्या मुलीवर नको तेच...
दोघेही एकमेकांचे अगदी घनिष्ठ मित्र बनले होते आणि एकमेकांच्या घरी जाऊ लागले होते. संजयच्या मित्राच्या सात वर्षीय मुलीला डोळ्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा संजय मिश्राने त्याला सांगितलं की, चित्रकूटमध्ये उपचारासाठी उत्तम डॉक्टर आहे. तो स्वत: तिकडे जाणार होता आणि मुलीवर उपचार करून घेणार होता. त्याच्यावर विश्वास ठेवत मित्राने आपल्या मुलीला त्याच्यासोबत पाठवले.
संजय आणि पीडित मुलगी ज्या ऑटो रिक्षातून प्रवास करत होती, त्याच रिक्षातून एक महिला देखील प्रवास करत होती. काहीतरी विचित्र सुरू असल्याचा तिला संशय बळावल्याने तिने जेल स्क्वेअरला याबाबतची माहिती दिली. या माहितीनंतर, नवाबाद पोलिसांनी कारवाई करत ऑटो रिक्षा चालकाला तातडीने ताब्यात घेतले.
रिक्षा चालकाने तरुण आणि पीडित मुलगी जिथे बसली होती याची माहिती दिली. पोलीस मुलीच्या घरी पोहोचले असता, कुटुंबीयांशी संवाद साधला. कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांचा मित्र संजय मिश्रा मुलीला उपचारासाठी घेऊन गेला होता.
दरम्यान जेव्हा आरोपीने पोलिसांशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितलं की, ग्वाल्हेरला पोहोचले, परंतु जेव्हा लोकेशन शोधले असता, तो झाशीमधील एलिट चौकाजवळ आढळून आला होता. पोलीस आणि कुटुंबीयांनी निष्पाप मुलीला तात्काळपणे घरी पाठण्यास सांगितले. यावर आरोपी मुलीला घराजवळ सोडून पळून गेला होता.
हे ही वाचा : गुरू - शिष्याच्या नात्याला काळिमा! शिक्षकाने 5 विद्यार्थिनींवर केले लैंगिक अत्याचार
आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
संबंधित प्रकरणाची माहिती पीडितेनं कुटुंबीयांना दिली. तेव्हा नवाबाद पोलिसांनी आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. अशातच आरोपीला घेऊन त्याच्याकडे असलेले पिस्तूर, काडतुसे आणि एक मोबाईल फोन देखील जप्त केला.
ADVERTISEMENT











