भाच्याचे मामीवर एकतर्फी प्रेम, मामाला शेतात नेत फुल्ल बिअर पाजली, नंतर स्कार्फने गळा आवळून संपवलं

crime news : भाच्याचा आपल्याच मामीवर जीव जडला होता. मोठा कट रचून भाच्याने मामाला बिअर पाजून नंतर त्याची गळा दाबून त्याची हत्या केली. या घटनेला अपघाताचे स्वरुप देण्यात आलं होतं, पण शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं गुपित गावासमोर आलं.  

crime news

crime news

मुंबई तक

• 07:00 AM • 03 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाच्याचे मामीवर एकतर्फी प्रेम

point

मामाला शेतात नेत फुल्ल बिअर पाजून संपवलं

Crime News : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील टांडा पोलीस ठाणे हद्दीतील सैदनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाच्याचा आपल्याच मामीवर जीव जडला होता. मोठा कट रचून भाच्याने मामाला बिअर पाजून नंतर त्याची गळा दाबून त्याची हत्या केली. या घटनेला अपघाताचे स्वरुप देण्यात आलं होतं, पण शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं गुपित गावासमोर आलं.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणेकरांसाठी मोठी बातमी, एप्रिलपासून वीज बिलात कपात होणार, महावितरणचा मोठा निर्णय

भाच्याचे मामीवर प्रेम

पोलिसांनी खुलासा करत हा खून मृत व्यक्तीचा भाचा वीरेंद्र याने त्याचा साथीदार जितेंद्र उर्फ छोटू याच्यासोबत केला. आरोपी वीरेंद्रने मामीवर प्रेम होते आणि मामाची हत्या करण्यासाठी त्याने मोठा गुन्हा केला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

मामाला शेतात नेत फुल्ल बिअर पाजून संपवलं

रामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अनुराग सिंह यांच्या म्हणण्यांनुसार, आरोपीने संपूर्ण हत्येचं नियोजन एखाद्या चित्रपटाला लाजवेल असं केलं होतं. भाचा, वीरेंद्र आपल्या मामाला एका शेतात घेऊन गेला, नंतर, बिअर पाजली आणि काका नशेत बेशुद्ध झाले. वीरेंद्रने मिळून मफलरने त्यांचा गळा दाबून तिची हत्या केली. संबंधित घृणास्पद कृत्य केल्यानंतर, पुरावे नष्ट करण्याचा आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा कट रचण्यात आला. 

हे ही वाचा : नागपूर : रेल्वे रुग्णालयात लोको पायलटने गळफास घेत संपवलं जीवन, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

पोलिसांना तुरी देऊन पळ काढण्यासाठी आरोपींनी मृतदेह मोटारसायकलवर ठेवला, त्यांना दोन्ही बाजूने धरले आणि एक दुचाकी सुरु केली. बाईकचा वेग वाढल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला घसरली, ज्यामुळे बघणाऱ्याला वाटते की, तरुणाचा अपघातातच मृत्यू झाला. पण पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवल्यानंतर वैज्ञानिक पुराव्यातून हत्येची माहिती समोर आली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.