पुणेकरांसाठी मोठी बातमी, एप्रिलपासून वीज बिलात कपात होणार, महावितरणचा मोठा निर्णय
पुण्याची गोष्ट : कडाक्याच्या उन्हाळ्यात पुणेकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वीज बिलात काहीअंशी प्रमाणात चिंता मिटणार असल्याचं बोललं जातंय. महावितरणाच्या वीजदराच्या कपातीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
38 लाख ग्राहकांना मोठा दिलासा
2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने वीज दरात कपात कमी करण्याचे नियोजन
पुण्याची गोष्ट : कडाक्याच्या उन्हाळ्यात पुणेकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उन्हाळ्यात अधिक एसी, कुलर तसेच फॅनसाठी विजेचा वापर होतो, यामुळे वीज बिलात अधिक वाढ होण्याची शक्यता असते. पण, आता याच वीज बिलात काहीअंशी प्रमाणात चिंता मिटणार असल्याचं बोललं जातंय. महावितरणाच्या वीजदराच्या कपातीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
38 लाख ग्राहकांना मोठा दिलासा
1 एप्रिलपासून घरगुती वीज दरांत 30 पैसे प्रतियुनिट कपात केल्याची माहिती आहे. या निर्णयाने पुणे परिमंडळात 38 लाख ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती आहे. महिनाअखेरीस तब्बल 10 कोटी रुपयांची बचत देखील होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणात राज्य सरकारने गुरुवारी हा निर्णय जारी केल्याची माहिती आहे.
2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने वीज दरात कपात कमी करण्याचे नियोजन
वीज निर्मितीसाठी लागणारं इंधन, कोळसा आणि इतर उत्पादनाचा खर्च कमी झाल्याने महावितरण, टाटा पॉवर आणि अदानीसारख्या वीज कंपन्यांच्या कपातीबाबत प्रस्ताव जारी करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने वीज दरात कपात कमी करण्याचे नियोजन करण्यात आले.
एकीकडे वीजदरात कपात झाली असली तरीही, (Wheeling Charges) 13 पैशांत वाढ करण्यात आली. सध्याचा वहन कर हा 1 रुपया 47 पैसे असून 1 रुपया 60 पैसे इतका होण्याची शक्यता आहे. मूळ स्वरुपात झालेली कपात अधिक असल्याने ग्राहकांच्या बिलामध्ये बचत होण्याची शक्यता आहे.









