महाराष्ट्र हादरला! वर्दीमागचं रक्तरंजित रहस्य, मुलीनेच घडवून आणली पोलीस बापाची हत्या; प्रियकराने 3 वर्षांनी उघड केला कट
Chandrapur Crime : चंद्रपूरातील एका हेड कॉन्स्टेबलच्या हत्येने खळबळ उडाली आहे. त्याच्या पोलिस असलेल्या मुलीने आणि तिच्या प्रियकरानेच ही हत्या केली. तीन वर्षानंतर या हत्येचा उलगडा झाला आहे. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र हादरला!
वर्दीमागचं रक्तरंजित रहस्य
मुलीनेच घडवून आणली पोलिस बापाची हत्या
प्रियकराने 3 वर्षांनी उघड केला भयानक कट
Chandrapur Crime, विकास राजुरकर : प्रेमप्रकरणात आड येत असलेल्या वडिलांना मुलीने विष देत ठार केल्याची घटना तीन वर्षानंतर उघडकीस आली आहे. जयंत बाल्लावर असे मृत वडिलांचे नाव असून ते पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी मृताची मुलगी आर्या बाल्लावार आणि तिचा पोलीस शिपाई असलेला प्रियकर आशिष शेडमाके यांच्यासह इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, तीन वर्षांपूर्वी झालेल्या या हत्येचा उलगडा आरोपी शेडमाके यानेच केला आहे. 23 मार्च रोजी त्याने पोलिसांना अर्ज करत याची माहिती दिली.
पाच हजार रुपये देऊन घेतले विष
आशिष शेडमाके व आर्या जयंत बाल्लावार यांचे प्रेमसंबंध होते. या संबंधाची चाहूल आर्याच्या वडिलांना लागली होती. यावरून वडील आर्यासोबत वाद घालत तिला मारहाण करीत होते. यामुळे आशिष व आर्याने जयंत बाल्लावार यांना विष देत ठार मारण्याचे ठरविले. मात्र विष कुठून घ्यायचे असा प्रश्न आशिष पुढे उभा राहिला. त्याने याकरिता मावशीच्या अल्पवयीन मुलाला हाताशी धरत 22 वर्षीय चैतन्य सचिन गेडाम (राहणार भद्रावती, चंद्रपूर) याच्याकडून विष विकत घेतले. 24 एप्रिल 2023 ला चैतन्यने आशिषला काचेच्या बाटलीत विष आणून दिले. त्यासाठी आशिषने 5 हजार रुपये दिले.
मिल्कशेकमध्ये मिसळून वडिलांना दिला
25 एप्रिल 2023 ला आर्याने वडील जयंत बाल्लावार यांना मिल्कशेकमध्ये विष टाकत ते पिण्यासाठी दिले. मिल्कशेक पिल्यावर जयंत बाल्लावार हे ड्युटीवर जाण्यासाठी प्रशासकीय भवन मध्ये गेले असता त्याठिकाणी त्यांना चक्कर आली. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासत मृत घोषित केले. विशेष म्हणजे चौकशीवेळी आर्याने पोलिसांना खोटी साक्ष दिली होती.









