मुंबई : प्रियकराने प्रेयसीसमोर केलं मैत्रिणीच्या केसांचं कौतुक, प्रेयसी मध्यरात्री थेट मैत्रिणीच्या घरात घुसली अन्...
Vesova News : सौंदर्याच्या मत्सरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीसमोर दुसऱ्या तरुणीच्या केसांची स्तुती केल्याने प्रेयसी भलतीच रागावली. यानंतर तिने थेट तरुणीच्या घरी जाऊन तिचे केस कापले आणि व्हिडिओदेखील बनवला. मुंबईतील वर्सोवा परिसरातील ही घटना आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने थेट वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई : प्रियकराने प्रेयसीसमोर केलं मैत्रिणीच्या केसांचं कौतुक
प्रेयसी मध्यरात्री थेट मैत्रिणीच्या घरात घुसली अन्...
Vesova News : सौंदर्याच्या मत्सरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीसमोर दुसऱ्या तरुणीच्या केसांची स्तुती केल्याने प्रेयसी भलतीच रागावली. यानंतर तिने थेट तरुणीच्या घरी जाऊन तिचे केस कापले आणि व्हिडिओदेखील बनवला. मुंबईतील वर्सोवा परिसरातील ही घटना आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने थेट वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिला मदत करणाऱ्या तीन मैत्रिणींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रेयसीसमोर केले केसांचे कौतुक
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची ओळख आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराशी झाली होती. आरोपीचा प्रियकर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडितेशी संवाद साधत असे. या संवादादरम्यान त्याने पीडितेच्या केसांचे कौतुक आपल्या प्रेयसीसमोर केले, तसेच तिला भेटायला जाणार असल्याचेही सांगितले. यामुळे प्रेयसीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि तिने 7 मार्च रोजी पीडितेचे घर गाठून तिचा मोबाईलही तपासला होता; मात्र तेव्हा तिला काहीही आक्षेपार्ह आढळले नव्हते. तरीही प्रियकराच्या त्या कौतुकाचा राग तिच्या मनात धुमसत होता.
हे ही वाचा : दहावी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी, SSB मध्ये 1060 पदांची भरती, 'असा' करा अर्ज
मध्यरात्री घरी जाऊन केसच कापले
हा राग अखेर 25 मार्च 2026 रोजी मध्यरात्री टोकाला पोहोचला. साडेबाराच्या सुमारास मुख्य आरोपी तरुणी आपल्या दोन मैत्रिणींसह पीडितेच्या वर्सोवा येथील घरी पोहोचली. आईस्क्रीमची डिलिव्हरी आली असावी या समजुतीने पीडितेने दरवाजा उघडताच, आरोपी तरुणीने तिला घराबाहेर ओढून जबरदस्तीने तिचे केस कापण्यास सुरुवात केली. यावेळी तिच्या सोबत आलेल्या मैत्रिणींनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. केस कापल्यानंतर 'हेअर नो हेअर' म्हणत आरोपीने पीडितेची थट्टा केली आणि कापलेले काही केस सोबत घेऊन तिथून पळ काढला.









