शाळेत घुसून तरुणाने प्रिन्सिपलवर केला गोळीबार, विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली

crime news : तरुणाने शाळेत घुसून मुख्याध्यापकावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या गोळीबारात मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले. त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यास सांगितले, या संबंधित घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे.

crime news

crime news

मुंबई तक

02 Apr 2026 (अपडेटेड: 02 Apr 2026, 09:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्याध्यापकावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार

point

शाळेतील 150 मुलं भयभीत

Crime news : एका तरुणाने शाळेत घुसून मुख्याध्यापकावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या गोळीबारात मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले. त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परिस्थिती बघता त्यानंतर ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले. ही घटना लखनऊ येथील रहीमाबाद ठाणे क्षेत्रातील जुगराजगंज येथे गुरुवारी दुपारी 12 वाजता घडली. या घटनेनं प्रभावती पीव्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परिसर हादरून गेल्याचं चित्र आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : डोंबिवलीत पुजाऱ्याचं विकृत कृत्य, घरात कोणीही नसताना 5 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

मुख्याध्यापक अनिल कुमार सिंह काय म्हणाले? 

संबंधित घटनेची माहिती मिळताच, मुख्याध्यापक अनिल कुमार सिंह यांनी सांगितलं की, 'ते ऑफिसमध्ये बसले होते. त्याचक्षणी विजय पाल वॅगन आर कारमधून शाळेसमोर आला. शस्त्र दाखवत तो कार्यालयात घुसला. जेव्हा प्राचार्य खुर्चीवरून उठून एका कपाटामागे लपले, तेव्हा आरोपीने गोळीबार केला. तेव्हा प्राचार्याच्या पोटाला गोळी लागली'. 

आरोपीने धमकी देऊन घटनास्थळावरून काढला पळ

गोळीचा आवाज ऐकूण शाळेतील इतर शिक्षक कार्यालयात धावून आले. संबंधित प्रकरणातील आरोपी विजय पाल दुसरी गोळी झाडणार इतक्यात, शिक्षकांसह काही स्थानिकांनी आरोपीला पकडले. मात्र, विजय पालने त्यांना धमकावून घटनास्थळावरून पळ काढण्यात यश मिळवले.  

शाळेतील 150 विद्यार्थ्यांमध्ये घबराट

गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने शाळेतील उपस्थित असलेल्या सुमारे 150 विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. घटनास्थळी एकच खळबळ उडाल्याचं चित्र निर्माण झालं. घटनास्थळी उपस्थित असलेले शिक्षक जगदीश कुमार, रमेश कुमार, कांचन, मानसी आणि अमित कुमार यांनी मुलांना नियंत्रणात आणले. दरम्यान, प्रथमोपचारानंतर त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. 

हे ही वाचा : सुनेला रात्री 12 वाजता विधीसाठी केली जबरदस्ती, सर्वच पुरुष नग्नावस्थेत, सासऱ्याने तिच्या उघड्या अंगावर...

प्राचार्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, वैयक्तिक संबंध आणि आर्थिक व्यवहारांवरून झालेल्या वादातून हत्येच्या उद्देशाने गोळीबार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.