नवरा गाढ झोपला होता, बायकोनं पाहिलं अन्... भयंकर कांड केलं

crime news एका महिलेनं कौटुंबिक वादातून तिच्या पतीचा गळा दाबून हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता, आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

31 Aug 2025 (अपडेटेड: 31 Aug 2025, 05:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीनं पतीची केली हत्या

point

धक्कादायक कारण आलं समोर

point

नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

Crime News : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस ठाणे परिसरातून एका महिलेनं कौटुंबिक वादातून तिच्या पतीचा गळा दाबून हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता, आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. पती झोपेत असताना पत्नीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सर्वच हादरून गेले आहेत.

हे ही वाचा : 'आरक्षणावर सरकार कसलाही तोडगा...' सोशल मीडियावर पोस्ट अन् राहत्या घरात मराठा तरुणाने संपवलं आयुष्य

पोलिसांनी सांगितला घडलेला प्रकार 

या प्रकरणाची अधिक माहिती देताना पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दिनेश चंद्र बघेल यांनी सांगितलं की, या घटनेदरम्यान 'ए टू झेड' परिसरात 30 वर्षीय पत्नी कविताने तिचा 40 वर्षीय पती संजय कुमारचा गळा दाबून हत्या केली आहे. मृताचे वडील भोपाळ सिंह यांनी कवितावर त्यांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप केला अशी पोलिसांनी तक्रार दाखल केली. यानंतर आता पोलिसांनी शनिवारी कविताला अटक केली आहे.

पती झोपलेला असताना केला खून 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान कविताने सांगितलं, पती संजय झोपलेला असतानाचे पाहिले आणि तिने तेव्हाच संजयचा गळा दाबून हत्या केली. तिने सांगितलं की, पहिल्या पत्नीमुळे संजयने माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचमुळे असं कृत्य केले. 

हे ही वाचा : Manoj Jarange Patil : ‘फडणवीसनं दोन खून केलेत’, जरांगे-पाटलांची स्फोटक मुलाखत

पोलिसांनी दिलेल्या एका महितीनुसार, संजय आणि कविता यांचे 2000 साली विवाह झाला होता. संजयची पहिली पत्नी त्याच्या मूळ गावी तांडा मजरा येथे राहते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

    follow whatsapp