Murder Case: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातीस भुज शहरात एक हादरवून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका प्रियकराने रागाच्या भरात त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. या हत्येमागचं नेमकं कारण काय? सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
प्रियकराचा नंबर ब्लॉक केला...
खरंतर, साक्षी आणि मोहित आदिपुरमधील कस्बे परिसरात एकमेकांच्या शेजारी राहत होते. दोघांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंधात होते. मात्र, काही काळानंतर साक्षीला हे नातं पुढे टिकवायचं नव्हतं. गुरुवारी (28 ऑगस्ट) साक्षी भुज शहरातील तिच्या कॉलेजमध्ये गेली. त्या दिवशी मोहितने तिला फोन केला आणि आदिपुरला परत येण्यास सांगितलं. साक्षीने मोहितच्या म्हणण्याला विरोध केला आणि तिला त्याच्यासोबत कोणत्याच प्रकारचा संबंध ठेवायचं नसल्याचं तिने मोहितला सांगितलं. नंतर साक्षीने तिच्या आईला मोहित त्रास देत असल्याचं सांगितलं. त्यावेळी तिच्या आईने मोहितचा नंबर ब्लॉक करण्याचा सल्ला दिला. आईच्या सांगण्यावरून साक्षीने मोहितचा नंबर ब्लॉक केला.
रागाच्या भरात केला चाकूने वार
साक्षीचं असं वागणं मोहितला अजिबात पटलं नाही. त्यावेळी रागाच्या भरात मोहित भुजमधील साक्षीच्या कॉलेजमध्ये पोहोचला. तिथे त्याने साक्षीला नंबर ब्लॉक करण्याचं कारण विचारलं. तेव्हा, मोहितसोबत असलेलं नातं नको असल्याचं साक्षीने स्पष्टपणे सांगितलं. हा ऐकून मोहितचा राग अनावर झाला. त्याने त्याच्याजवळ असलेला चाकू बाहेर काढला आणि साक्षीचा गळा चिरला. या सगळ्या प्रकारानंतर तो तिथून पळून गेला.
हे ही वाचा: लग्नानंतर 6 महिने नव्हते शारीरिक संबंध! तरीही राहिली गरोदर, पती संतापला अन्... प्रेमविवाह होऊन सुद्धा काय घडलं?
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
घटनेनंतर साक्षीला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यावेळी तिची प्रकृती गंभीर होती आणि शुक्रवारी (29 ऑगस्ट) तिचा मृत्यू झाला. त्यानंतर, पोलिसांनी सुरुवातीला मोहितविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. साक्षीच्या मृत्यूनंतर, आता त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 103 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल.
हे ही वाचा: पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर गळा दाबला अन् दांडक्याने... पत्नीने केलं भयंकर कृत्य!
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहितला गुरुवारी रात्रीच अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मोहित आणि साक्षीमध्ये आधीच वाद सुरू असल्याचं समोर आलं. साक्षीने मोहितसोबतच्या नात्याला नकार देणं हेच हत्येचे कारण बनले. सध्या, पोलीस या घटनेचा तपास करत असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
