crime news : एका सरकारी शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने रात्री उशिरा शाळेतील प्रासाधनगृहात बाळाला जन्म दिला. पीडित विद्यार्थिनीचं बाळ सध्या सुरक्षित असून उपचार सुरू आहेत. संबंधित घटना कर्नाटकातील आहे. शाळेच्या कागदपत्रावर नमूद केलेल्या वयानुसार पीडित ही 17 वर्षीय अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शिक्षक आणि शिक्षिका करत होते अश्लील चाळे, विद्यार्थिनीनं पाहिलं, नंतर तरुणीला जाळलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनीने प्रसाधनगृहात बाळाला दिला जन्म
कर्नाटक राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य कोसंबु यांनी दिलेल्या माहितीनुसार, यादगीर जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेत एका विद्यार्थिनीने एका बाळाला पहाटे 2.30 वाजता प्रसाधनगृहात जन्म दिला. बाल हक्क आयोगाने संबंदित प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला. जिल्हा हक्क संरक्षण कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याबाबतचे निर्देश दिले.
जिल्हा दंडाधिकारी हर्षल भोयर यांनी पीडितेची घेतली भेट
संबंधित प्रकरणात जिल्हा दंडाधिकारी हर्षल भोयर यांनी आई आणि लहान बाळाला दाखल केलेल्या रुग्णालयात गेले होते. तेव्हा त्यांनी दोघांचीही चौकशी केली होती. तसेच विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे तातडीने आदेशही देण्यात आले आहेत. शाळेचा एकूण निष्काळजीपणा समोर आला आहे, असे भोयर म्हणाले.
हे ही वाचा : 'सरकार आरक्षण देत नाही...' शेतकऱ्याची रस्त्यावर गळफास घेत टोकाची भूमिका, सुसाईड नोटची गावभर चर्चा?
पोलीस अधीक्षक पृथ्वीक शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर प्रकरणात मुख्याध्यापरक वॉर्डन, स्टाफ आणि पीडितेच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली आहे.
पुण्यातील अशीच घटना
पुण्यातील खडकीत एका 15 वर्षीय मुलाने एका 14 वर्षीय मुलीला गर्भवती केलं. या घटनेनं खडकी हादरून गेली आहे. ते दोघेही एकमेकांना गेल्या काही वर्षांपासून ओळखत होते. गेली दोन वर्षे त्यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांची अधिक जवळीकता वाढल्यानं त्यांनी त्यांनी एकमेकांशी शरीरसंबंध ठेवले आणि त्यातूनच मुलगी गर्भवती राहिली.
ADVERTISEMENT











