Valentine चा 'प्रेमळ' सापळा अन्... नराधमाकडून 17 वर्षीय मुलीसोबत अत्यंत घाणेरडं कृत्य

गडचिरोली येथे एका 25 वर्षीय तरुणाने एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

on valentine day a young man proposed to a minor subsequently accused youth engaged in sexual relations with a 17 year old minor girl causing her to become pregnant

Gadchiroli Crime

मुंबई तक

12 Mar 2026 (अपडेटेड: 12 Mar 2026, 10:27 PM)

follow google news

व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली: प्रेमाचा दिवस मानल्या जाणाऱ्या 'व्हॅलेंटाईन डे'चा आधार घेऊन 25 वर्षीय नराधम तरुणाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरची पोलिसांनी 25 वर्षीय आरोपीला अटक केली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

घटनेची अधिक माहिती अशी की, अजय टिल्लू कल्लो (वय 25, रा. जांभळी) याने 14 फेब्रुवारी 2025 रोजी, म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला गाठले. "तू मला खूप आवडतेस," असे म्हणत प्रपोज केलं. त्यानंतर त्याने हळूहळू लग्नाची आमिष दाखवलं. वयात येत असलेल्या त्या मुलीला अजयच्या शब्दांवर विश्वास बसला आणि तिथूनच या शोषणाची सुरुवात झाली.

हे ही वाचा>> मुंबईच्या डॉक्टर स्तुती सोनावणेनं बॉयफ्रेंड फैजुलमुळे संपवलं आयुष्य, 'त्या' चिठ्ठीत हादरवून टाकणारा खुलासा

अजयने पीडित मुलीला लग्नाचे वचन दिले आणि तिला आपल्या विश्वासात घेतले. या विश्वासाचा फायदा घेत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एका वर्षांहून अधिक काळ, म्हणजेच 10 मार्च 2026 पर्यंत अजय तिला लग्नाचे स्वप्न दाखवत वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिला.

कसा उघडकीस आला अत्याचार?

पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी आजारी पडली. जेव्हा तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तेव्हा ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. आपल्यासोबत झालेली फसवणूक आणि क्रूरता लक्षात येताच, मुलीने धाडस करून कोरची पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली.

हे ही वाचा>> सासूने सुनेला रात्री 1 वाजता प्रियकरासोबत रेड हँड 'नको त्या' अवस्थेत पकडलं, अन् अर्धा तासात...

बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अहवालातून तिच्या गर्भधारणेची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली.

फिर्यादीवरून कोरची पोलिसांनी ११ मार्च रोजी आरोपी अजय कल्लो याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

* भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ६४ (२) (एम) आणि ६४ (२) (आय)

* पोक्सो (POCSO) कायदा: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासाठी कडक तरतुदी.

पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

    follow whatsapp