Mumbai Crime: नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका व्यक्तीने मित्रावर कर्ज न फेडू शकल्याने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, पीडित तरुणाच्या मित्राने त्याची किडनी काढून टाकण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 ऑगस्ट रोजी घडली असून पीडित तरुणाने 26 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा सुरू केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
काय आहे नेमकं प्रकरण?
पीडित तरुण नवी मुंबईतील पनवेल येथील अकुरली परिसरातील रहिवासी असून तो एक ऑटो-रिक्षा चालक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये संबंधित तरुणाने ऑटो-रिक्षा खरेदी करण्यासाठी एका खाजगी बँकेकडून कर्ज घेतले होते आणि त्याचा मित्र त्या कर्जाचा जामीनदार होता. पनवेल पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण बँकेकडून घेतलेल्या लोनचे हफ्ते फेडू शकला नाही आणि त्यामुळे बँकेने त्याचं वाहन जप्त केलं. यासोबतच कर्जाचा जामीनदार म्हणजेच संबंधित तरुणाच्या मित्राचे बँक खाते फ्रीझ केलं.
हे ही वाचा: ''पप्पांनीच मम्मीला...'' पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय अन् जिवंतच जाळलं... 7 वर्षांच्या मुलीने आणलं उघडकीस...
तोंडात रूमाल कोंबून मारहाण
त्यानंतर, 9 ऑगस्ट रोजी दोन तरुण बँकेत पोहोचले आणि त्यावेळी त्यांना 36 हजार रुपयांची थकबाकी भरण्यास सांगण्यात आलं. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बँकेत गेल्यानंतर, आरोपीने त्याच्या मित्राला चर्चा करण्याच्या बहाण्याने पनवेलमधील वाजेगाव येथे त्याच्या घरी नेलं. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या घरी आपल्या मित्राला खुर्चीवर बसवलं आणि त्याचे हात-पाय बांधले. इतकेच नव्हे तर त्यानंतर आरोपीने मित्राच्या तोंडात रूमाल कोंबला आणि त्याला बेदम मारहाण केली.
किडनी काढून विकण्याची धमकी..
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीवरून, पैसे परत न केल्यास त्याची किडनी काढून ती विकण्याची धमकी पीडित तरुणाला त्याच्या मित्राने दिली. तसेच, हल्ला केल्यानंतर आरोपीने पीडित तरुणाच्या खिशातून 12,300 रुपये काढले आणि मित्राला जखमी अवस्थेत सोडून आरोपी तिथून निघून गेला.
हे ही वाचा: 10 वर्षीय मुलीवर बलात्कार अन् निर्घृणपणे हत्या! नंतर सापडला झाडाला लटकलेला मृतदेह... घडलं भयानक
पोलिसांनी गुन्हा दाखल केला
पोलिसांनी सांगितलं की तक्रारीच्या आधारे, आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम127(7) ( बंदिस्त करणे), 118(1) आणि 115(2) (पीडितेला जाणूनबुझून जखमी करणे), 351(2) (गुन्हेगारी धमकी) आणि 352 (शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
