बीड जिल्ह्यात टोळक्यांनी आईसह लेकीवर लोखंडी पाईप अन् रॉडनं केला हल्ला, जनावरासारखं काळं निळं होईपर्यंत मारलं

Beed Crime : बीडमध्ये काही टोळक्यांनी मिळून लेकीसह आईला बेदम मारहाण केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Beed Crime

Beed Crime

मुंबई तक

28 Aug 2025 (अपडेटेड: 28 Aug 2025, 01:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड पुन्हा हादरलं!

point

माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना

point

टोळक्यांकडून आईसह लेकीला बेदम मारहाण

Beed Crime : बीडच्या चऱ्हाटा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही टोळक्यांनी जागेच्या वादावरून आई आणि मुलीसह इतर तिघांवर लोखंडी पाईप, रॉडने हल्ला करत बेदम मारहाण केली. या टोळक्यांमध्ये 4 ते 5 जणांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आता बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : णेशोत्सवाला गालबोट! कोकणात लेकानेच आईच्या गळ्यावर धारदार शस्त्राने केले सपासप वार, नंतर स्वत:चीच नस कापली अन्

या हल्ल्यात महिलांना बेदम मारहाण करण्यात आल्यानं गंभीर इजा झाली होती. यातूनच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुतीला दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद विकोपाला गेला आणि टोळक्यांनी महिलांवर हल्ला करत अमानुषपणे मारहाण केली. 

महिलांना काळं निळं होईपर्यंत मारहाण

अमानुषपणे मारहाण केल्यानं पीडितांचं शरीर काळं निळं पडलं. या घटनेचा एकानं व्हिडिओ शूट केला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंदित घटनेची माहिती गावभर पसरताच ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. या भीषण अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

हे ही वाचा : विरारमध्ये जीर्ण झालेली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली आईसह लेकीचा मृतदेह, क्षणार्धात अनेक कुटुंबं हरपली

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

ही घटना घडल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकतेचा तपास सुरु करण्यात आला आहे. आरोपींची सध्या शोधमोहिम सुरू आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच परिसरात तणावाचं गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. 

    follow whatsapp