Crime News : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आता समोर आली आहे. विद्यार्थिच आपल्या शिक्षिकेच्या प्रेमात पारच वेडापिसा झाला. त्यानं आपल्या प्रेमासाठी वाट्टेल ते केलं. तो एवढ्यावरच न थांबला त्याने आपल्या शिक्षिकेवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता पीडित शिक्षिका ही जखमी झाली आहे. दरम्यान, पीडित शिक्षिकेची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ऑनर किलिंगनं नांदेड हादरलं! तरुणीचे विवाहबाह्य संबंध, बॉयफ्रेंडसोबत सापडली सासरच्या घरात, नंतर वडिलांनी खोल विहिरीतच दिलं ढकलून
नेमकं काय घडलं?
ही घटना सोमवारी सायंकाळी 3:30 वाजता घडली आहे. आरोपी विद्यार्थ्याचे नाव सूर्याश कोचर असे आहे. पोलिसांनुसार, दोघेही एकमेकांना दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. पीडित शिक्षिकेच्या घरी जाऊन विद्यार्थ्याने हे हैवानी कृत्य केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी पीडित शिक्षिकेसोबत एकतर्फी प्रेम करत होता. त्यातूनच त्याने हे कृत्य करत गुन्हा केला आहे.
शाळेच्या मुख्यध्यापकांनी काढलं अन्...
सूर्याश कोचर हा कल्याणपुर येथील एका सरकारी शाळेत इयत्ता 12 वी चं शिक्षण घेतोय. संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, एका वर्षांपूर्वी तो याच शिक्षिकेच्या वर्गात शिकत होता. त्याच्या याच कारणाम्यांमुळे शाळेच्या मुख्यध्यापकांनी त्यांना शाळेतून काढून टाकले होते.
पीडित शिक्षिकेवर उपचार सुरू
दरम्यान, विद्यार्थी सूर्याश कोचरने केलेल्या या कृत्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत. पीडिच शिक्षिकेला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सांगण्यात येत आहे की, पीडितेचं शरीर 20 टक्के भाजले गेले आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थी सूर्याश कोचरवर कलम 124 A अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : गर्लफ्रेंडच्या मागोमाग मॉलच्या वॉशरूममध्ये घुसला बॉयफ्रेंड, तिथेच सुरू केले अश्लील चाळे आणि...
दरम्यान, विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. गुरू आणि शिष्याचं नातं हे जगातिल एकूण पवित्र नात्यांपैकी एक आहे. पण सध्या या नात्यातील मूल्य कुठे तरी हरवत चाललं आहे.
ADVERTISEMENT
