गणपती मंडपात मृत्यूचा तांडव... चाकूने वार करून तरुणाची हत्या! नेमकं काय घडलं?

पूर्व दिल्लीतील मांडवली भागात गणपती मंडपाजवळ एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.

चाकूने वार करून तरुणाची हत्या!

चाकूने वार करून तरुणाची हत्या!

मुंबई तक

• 11:02 AM • 28 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

गणपती मंडपात मृत्यूचा तांडव

point

मंडपाजवळ चाकूने वार करून तरुणाची हत्या!

Crime News: संपूर्ण देश गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असताना याच काळात दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीतील मांडवली भागात गणपती मंडपाजवळ एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी (27 ऑगस्ट) रात्री उशिरा राजेंद्र पार्क परिसरात घडली. त्या ठिकाणी गणेश चतुर्थीचा उत्सव सुरू होता. तिथल्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक तरुणावर चाकूने हल्ला केला. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

हे वाचलं का?

तरुणावर चाकूने वार... 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणावर चाकूने वार केल्यानंतर तो सुमारे अर्धा तास जमिनीवर तडफडत होता. गणपती मंडपात उपस्थित असलेले लोक पीडित तरुणाला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करत होते. पण तोपर्यंत त्याची प्रकृती बिघडली होती आणि वाटेतच तरुण मृत पावला. मृताची ओळख अद्याप पटलेली नसल्याची पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान! प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांची उपस्थिती...

गणपती मंडपात अचानक घडली घटना... 

गणपती मंडपात अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. दीपक नावाच्या एका तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, ‘ही घटना इतकी अचानक घडली की लोकांना याबद्दल काहीच समजलं नाही. तरुणावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर लगेच घटनास्थळावरून पळून गेले.’

प्राथमिक तपासात आलं समोर  

मांडवली पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि लगेच त्यांनी तपास सुरू केला. घटनेपूर्वी मृत तरुण आणि हल्लेखोरांमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण झालं असावं, असे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. सध्या, पोलीस या घटनेचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा: मुंबईतील गणेशोत्सवात AI कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारांवर करडी नजर, हजारो मुंबई पोलिसांची सुरक्षेसाठी ऑन ड्यूटी

आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. हल्लेखोर कुठून आले आणि घटनेमागील खरे कारण काय होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य बाहेर येईल. लवकरच आरोपींना पकडण्यात येणात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp