33 वर्षीय तरुणासाठी महिलेनं नवऱ्याला बॉयफ्रेंडच्या मदतीने.. रेल्वे रुळावर जाळलेला पतीचा पाय अन्...

Extra marital affair : देशभरात अनैतिक संबंधाच्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. या अनैतिक संबंधामुळे अनेकांचं संसार उघड्यावर पडले आहेत, तर काहींचे संसार मोडल्याचं चित्र आहे. एक अशीच घटना उघडकीस आली आहे.

extra marital affair (grok)

extra marital affair

मुंबई तक

26 Aug 2025 (अपडेटेड: 26 Aug 2025, 04:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना

point

महिलेनं बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला संपवलं

point

रेल्वेरुळावर जळता पाय

Extra marital affair : देशभरात अनैतिक संबंधाच्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. या अनैतिक संबंधामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत, तर काहींचे संसार मोडल्याचं चित्र आहे. एक अशीच घटना उघडकीस आली आहे. महिलेनं आपल्या 33 वर्षीय तरुणासाठी आपल्या 56 वर्षीय पतीची हत्या केली आहे. संबंधित प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्यांच्या पोलिसांनी  मुसक्या आवळल्या आहेत. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये मीनाक्षम्मा आणि तिचा प्रियकर प्रदीप आणि त्यांचे इतर दोन मित्र सिद्धेश आणि विश्वास अशी नावे समोर आली आहेत. तसेच मृत पतीचे नाव सुब्रमण्यम (वय 60) अशी नावे आहेत. ही घटना कर्नाटकातील चिकमंगलूर येथील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ऑनर किलिंगनं नांदेड हादरलं! तरुणीचे विवाहबाह्य संबंध, बॉयफ्रेंडसोबत सापडली सासरच्या घरात, नंतर वडिलांनी खोल विहिरीतच दिलं ढकलून

एकूण प्रकरण काय? 

संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मीनाक्षम्माला न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी न्यायलयीन कोठडी सुनावली. पोलिसांनुसार, 2 जून रोजी मीनाक्षम्माने कुदर पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल करत नमूद केलं होतं की, सुब्रमण्यम 31 मे रोजी बाहेर गेले होते आणि त्यानंतर ते पुन्हा घरीच परतले नाही. संबंधित तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. 

या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सुब्रमण्यच्या मोबाईलचा फोन ट्रॅक केला, 3 जून रोजी रेल्वे पोलिसांनी कदुर पोलिसांना रेल्वेच्या फलाटावरील ट्रॅकवर अर्धा जळालेला मृतदेह पाहिला. तसेच उर्वरित मृतदेहाचे तुकडे गोळा केले. सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर प्रदीप, सिद्धेस आणि विश्वास हे तिघेजण एका कारमधून प्रवास करताना दिसले होते. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सीसीटीव्हीत दिसणाऱ्या तिघांना अटक केली. 8 जून रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान, आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तक्रारीदरम्यान, सांगण्यात आले प्रदीपचे आणि मीनाक्षम्मा यांचे एकमेकांवर प्रेम होते, पण कसलाही पुरावा न मिळाल्याची खरी माहिती समोर आली नाही. 

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मीनाक्षम्मा तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर खूप रडू लागली होती. सुरूवातीला आम्हाला तिच्यावर कसलाही संशय आला नाही, परंतु जेव्हा आम्ही प्रदीप आणि त्याच्या मित्रांची चौकशी केली असता, हे प्रकरण उघडकीस आलं. प्रदीपविरोधात कसलेही पुरावे नसल्याचं दिसून आलं. 

हे ही वाचा : शिक्षिकेवर जडला विद्यार्थ्याचा जीव, एकतर्फी प्रेमात वेड्यासारखं लागला करू, घरात घुसून चेहऱ्यावर पेट्रोल...

कॉल डिटेल्स तपासण्यात आले

संबंधित प्रकरणात मीनाक्षम्म आणि प्रदीप यांच्यातील कॉल डिटेल्स तपासण्यात आले. पण गेली सहा महिने त्यांनी एकमेकांशी फोनद्वारे कसलाच संपर्क साधला नव्हता. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की मीनाक्षम्मा ही वारंवार एका मोबाईल कॉल करायची आणि नंतर मेसेज करायची. त्यात मोबाईल नंबरचा तपास केला असता, तो फोन प्रदीपच्या आईच्या नावावर नोंदणीकृत करण्यात आला. याच एका सिमकार्डमुळे अख्ख प्रकरण समोर आलं. 

सुब्रमण्यम यांच्या हत्येचा कट

31 में रोजी प्रदीप आणि इतर आरोपींनी सुब्रमण्यम यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यानंतर आरोपी हे सुब्रमण्यम यांच्या दुकानात गेले आणि त्यांना गाडीत बसवण्यात आले आणि इतर आरोपींना सुब्रमण्यम यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यानंतर आरोपीं हे सुब्रमण्यम यांच्या दुकानात गेले आणि त्यांना जबरदस्ती गाडीत बसवले. त्यानंतर त्यांना एका निर्जनस्थळी नेण्यात आले, त्यानंतर प्रदीपने दारूच्या नशेतच प्रदीपचा गळा चिरला. नंतर आरोपींनी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असता, तो पूर्णपणे जळाला नाही. नंतर तो मृतदेह तिथेच सोडण्यात आला. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी नंतर मीनाक्षम्माने तिच्या पतीच्या मृत्यूची पुष्टी करत पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रकरण समोर आलं. 


    follow whatsapp