Crime News : आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही आजही सासरी सूनांचा छळ केला जातो. अनेक विवाहित महिलांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत जीवन संपवलं. तर पतीनेच आपल्या बायकोला संतप्त होत रागाच्या भरात संपवल्याच्या अनेक घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. दिल्लीहून अशीच एक घटना समोर आली आहे. पीडित विवाहित महिलेच्या वडिलांनी आपल्या मुलीला हैवानी नवऱ्याच्या जाचातून सोडण्याचा प्रयत्न केला असता, उलट जावयाने सासऱ्यावरच पेट्रोल टाकून त्याची हत्या केली आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. आरोपी पतीचं नाव संदीप असे आहे. तर पीडित मृत महिलेचं नाव निशा असे होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ऑनर किलिंगनं नांदेड हादरलं! तरुणीचे विवाहबाह्य संबंध, बॉयफ्रेंडसोबत सापडली सासरच्या घरात, नंतर वडिलांनी खोल विहिरीतच दिलं ढकलून
नेमकं काय घडलं?
निशाचे वडील रणवीस सिंग यांनी आपल्या मुलीचा विवाह संदीप नावाच्या तरुणाशी लावून दिला होता. त्यानंतर सर्वकाही व्यवस्थित होईल असे वाटले होते. पण, संदीपला दारूचं व्यसन होतं, संदीप पीडित निशाला बेदम मारहाण करायचा. त्यानंतर पीडित तरुणी आपल्या सासरच्यांना कंटाळून माहेरी गेली होती. नुकताच 15 ऑगस्ट रोजी दोघांमध्ये वाद उफळला होता. 16 ऑगस्ट रोजी पीडितेचा पती संदीप हा आपल्या सासरी म्हणजे निशाच्या माहेरी आला. तेव्हा संदीपने आपले सासरे म्हणजेच रणवीर यांच्याकडे निशाला पुन्हा घेऊन जातो असे सांगितले, तेव्हा निशाचे वडील रणवीर यांना पूर्णपणे विरोध केला.
निशावर पेट्रोल टाकलं आणि माचिसने पेटवलं
तेव्हाच संदीपला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या सासऱ्यांवर पेट्रोल टाकलं आणि माचिसने पेटवलं. त्यानंतर पीडित रणवीर यांना लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण, प्रकृती पाहता त्यांना सफदरजंग येथे हलवण्यास सांगितले. त्यांच्यावर काही दिवस उपचार सुरू होते, त्यानंतर रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हे ही वाचा : 33 वर्षीय तरुणासाठी महिलेनं नवऱ्याला बॉयफ्रेंडच्या मदतीने.. रेल्वे रुळावर जाळलेला पतीचा पाय अन्...
पोलिसांनी संबंधित प्रकरणात तपास केला असता, संदीप हा हिंसक प्रवृत्तीचा आहे. तो नशेच्या आहारी गेला होता, तो नशेच्याभरात काहीही करायचा. त्याने अनेकदा आपल्या आईला अनेकदा मारहाण केली होती. पोटापाण्यासाठी तो बागेत माळीचं काम करायचा. 19 ऑगस्ट रोजी संदीप शाळेच्या भोवताली दिसला असता, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
ADVERTISEMENT
