Mumbai Crime: मुंबईतील कफ परेड पोलिस स्टेशन अंतर्गत नरिमन पॉइंटजवळील समुद्रातून एका 19 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोमवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास प्रिन्सेस रोडच्या मागे समुद्रकिनाऱ्यावर स्थानिकांना मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी या घटनेसंदर्भात सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी जी.टी रुग्णालयात पाठवण्यात आला.
ADVERTISEMENT
शौचास गेली अन् परतलीच नाही...
प्राथमिक तपासात मृत महिलेचे नाव मनीता गुप्ता असल्याची माहिती समोर आली. ती मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी असून मुंबईतील कफ परेडमधील मच्छिमार नगरमध्ये तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. रविवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास मनीता शौचास जाण्यासाठी घराबाहेर पडली आणि बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली. त्यांनी शौचालय आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, पण ती कुठेच दिसली नाही. त्यानंतर, मनीताच्या वडिलांनी कफ परेड पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: गर्लफ्रेंडच्या मागोमाग मॉलच्या वॉशरूममध्ये घुसला बॉयफ्रेंड, तिथेच सुरू केले अश्लील चाळे आणि...
उत्तर प्रदेशातील तरुणावर प्रेम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीताच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की त्यांची मुलगी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम करत होती. काही दिवसांपूर्वी याच कारणामुळे घरात वाद झाला होता कारण कुटुंबियांना त्यांच्या मुलीच्या पसंतीचा मुलगा (प्रियकर) आवडत नव्हता, तसेच मनीताला तिच्या प्रियकरासोबतच लग्न करायचं होतं. त्यामुळे वडिलांना मुलीने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली असावी, असा संशय येत आहे.
हे ही वाचा: विवाहित तरुणीचे नातेवाईकासोबतच होते अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला अन् तोंडात कोंबली स्फोटकं!
सध्या, पोलीस मनीताच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. तिच्या शरीरावर कोणत्याही संशयास्पद जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत. याप्रकरणी पोलिसांकडून आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कफ परेड पोलिसांनी मनीताच्या वडिलांसह इतर कुटुंबियांचे जबाब नोंदवले असून पोलीस प्रत्येक बाजूने प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
