Crime News: मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका नवविवाहित वधूचा मृतदेह तिच्या खोलीत फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. यासंबंधी पीडित महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या पती आणि सासूवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पती आणि पत्नीला कधीही एकट्यात झोपू दिले जात नव्हतं. पीडितेची सासू दोघा नवरा आणि बायकोच्या मध्ये झोपत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
हे प्रकरण अशोकनगर जिल्ह्यातील अखाई टप्पा गावातील आहे. येथे 24 वर्षीय सुधा रघुवंशी या नवविवाहित महिलेचा मृतदेह तिच्या खोलीत ओढणीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, सुधा हिचा विवाह चार महिन्यांपूर्वी 29 एप्रिल रोजी संजय रघुवंशी नावाच्या तरुणाशी झाला होता. सुधा एलएलबी (LLB) ची विद्यार्थिनी होती. रविवारी (24 ऑगस्ट) पीडितेच्या सासूने सूनेचा मृतदेह पाहिला आणि लगेच कुटुंबियांना कळवलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यावेळी पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून तो जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला.
हे ही वाचा: विवाहित तरुणीचे नातेवाईकासोबतच होते अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला अन् तोंडात कोंबली स्फोटकं!
सासू पती आणि पत्नीच्या मध्ये झोपायची
पीडितेचे आजोबा बुंदेल सिंग यांनी पोलिसांना सांगितलं की, सुधा तिच्या लग्नापासूनच नाराज होती. तसेच तिचा पती संजय हा ड्रग्ज व्यसनी असल्याचा देखील त्यांनी आरोप केला. याच कारणामुळे संजय आणि सुधा या दोघांमध्ये वाद झाला होता. 25 दिवसांपूर्वी यासंबंधी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली असल्याचं आजोबांनी सांगितलं. सुधाला एलएलबीचं शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती. मात्र, तिचे सासरचे लोक तिला अभ्यास करण्यापासून रोखत असत. एके दिवशी आधी संजयने सुधावर 10 हजार रुपये चोरल्याचा आरोप केला होता. इतकेच नव्हे तर सुधाला कधीही तिच्या पतीसोबत एकट्यात झोपू दिलं जात नव्हतं. तिची सासू पती आणि पत्नीच्या मध्ये झोपायची.
हे ही वाचा: मुलीचं होतं दुसऱ्याच तरुणावर प्रेम! घरच्यांना पटलं नाही म्हणून... नरिमन पॉइंटजवळ समुद्रात सापडला मृतदेह
पतीने केले पीडितेवर आरोप
तसेच, पीडितेचा पती संजयच्या मते, सुधा त्याच्यावर खोटे आरोप करायची. रात्री 12 वाजेपर्यंत सुधा फोनवर कोणाशी तरी बोलत असायची. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याने पुढे सांगितलं की, यापूर्वीही सुधाने त्याच्यावर ड्रग्ज सेवन आणि दारू पिण्याचा आरोप केला होता. तसेच, सुधा तिच्या पतीला ती त्याला ट्रान्सजेंडर म्हणत असल्याचं संजयने सांगितलं. एक दिवस आधी त्याने सुधाकडे चाकू पाहिला होता आणि त्याचा व्हिडिओही बनवला असल्याचं संजयने म्हटलं.
मृत सुधाच्या पतीच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर सर्व काही ठीक चाललं होतं, पण सुधा त्याच्यावर खोटे आरोप करायची. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि कुटुंबियांच्या जबाबांच्या आधारे, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
