Nanded Crime : नांदेडमध्ये ऑनर किलिंकचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पित्याने आपल्या लेकीसह तिच्या बॉयफ्रेंडला एका विहिरीत ढकललं आणि त्या दोघांचीही हत्या केली आहे. आरोपीनं पोलीस ठाणे गाठत स्वत: घडलेल्या घटनेची माहिती देत हत्येचा कबुलीनामा दिला. ही मन हेलावून टाकणारी धक्काादायक घटना नांदेडमधील उमरी तालुक्यात 25 ऑगस्ट रोजी घडली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढला असता, ओळख पटली. संजीवनी कमळे (वय 19) आणि लखन बालाजी भंडारे (वय 19) अशी मृत व्यक्तींची नावे आता समोर आली आहेत. या ऑनर किलिंग घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गर्लफ्रेंडच्या मागोमाग मॉलच्या वॉशरूममध्ये घुसला बॉयफ्रेंड, तिथेच सुरू केले अश्लील चाळे आणि...
भयंकर प्रकरण
मयत असलेली संजीवनी ही सुरने या उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथील रहिवासी आहेत. तिचा एका वर्षापूर्वी सुधाकर कमळे या मुलासोबत विवाह झाला होता. लग्नापूर्वी संजीवनीतं लखन भंडारे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही हे प्रेमसंबंध थोडसंही कमी झालं नाही. सासरचे मंडळी बाहेर गेल्यानंतर संजीवनीने लखनला आपल्या घरी बोलावले. अचानकरणे घरी परतलेल्या सासरच्या मंडळींनी दोघांना आक्षेपार्ह परिस्थिती पाहिले.
40 फूट खोल विहिरीत फेकून दिले अन्...
त्यानंतर संजीवनीच्या नवऱ्याने आणि तिच्या सासरच्यांनी फोन करत तिचे वडील मारोती सुरेन यांना बोलावले होते. त्यानंतर मुलीला घरी घेऊन जा असे सांगितले. तेव्हा मुलीचे वडील मारुती सुरणे,काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे गोळेगाव येथील मुलीच्या सासरच्या घरी पोहोचले. त्यानंतर आरोपी मुलाला आणि मुलीला घेऊन जात असताना मुलीच्या वडिलांनी दोघांनाही रस्त्यात लागणाऱ्या एका 40 फूट खोल विहिरीत फेकून दिले. संबंधित प्रकरणाची माहिती ऐकून पोलिसही हादरून गेलेत.
हे ही वाचा : मुलीचं होतं दुसऱ्याच तरुणावर प्रेम! घरच्यांना पटलं नाही म्हणून... नरिमन पॉइंटजवळ समुद्रात सापडला मृतदेह
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला, तसेच तिच्या बॉयफ्रेंडच्या मृतदेहाचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. रम्यान, घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सध्या मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे, परंतु रात्री 11 वाजता मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
