Nikki Murder Case Shocking News : ग्रेटर नोएडाच्या निक्की हत्याकांड प्रकरणात एन्काउंटर झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी रविवारी आरोपी पती विपिनवर गोळी झाडली होती. जेव्हा आरोपीने पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. रिपोर्टनुसार, पोलिसांनी म्हटलंय की, आरोपी विपिन भाटीने पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांच्या गोळीबारात विपिन जखमी झाला.
ADVERTISEMENT
उपचारादरम्यान झाला मृत्यू
सासरच्या घरी 28 वर्षीय निक्कीची हत्या करण्यात आली होती. निक्कीला मारहाण करत तिला जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. निक्कीवर गुरुवारी सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरु होते, त्यावेळी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी विपिनला अटक केली होती. निक्की गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
हे ही वाचा >> '...आम्ही परत जाणार नाही', मराठा समाजाचा 'चलो मुंबई' मोर्चा आझाद मैदानावर धडकणार, जरांगेंनी CM फडणवीसांना दिला इशारा
पीडित तरुणीची बहीण कंचन, जी विपिनचा भाऊ रोहितची पत्नी आहे. तिने आरोप केला आहे की, विपिन आणि सासू दयाने निक्कीला जाळून टाकलं होतं. कंचनने निक्कीवर हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आणला होता. सासू आणि पतीने निक्कीवर जीवघेणा हल्ला केल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं होतं.
पोलिसांनी आरोपी विपिनला ठोकल्या बेड्या..
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी विपिनला अटक केली आहे. तर तिची आई दया आणि वडील सत्यवीरसह भाऊ रोहित फरार आहे. निक्कीचे वडील भिकारी सिंह पायला यांनी म्हटलं की, आरोपींना गोळी मारण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
हे ही वाचा >> Amit Shah Interview : माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
त्यांनी म्हटलं की, ते मारेकरी आहेत. त्यांना गोळी मारली पाहिजे. त्यांचं घर तोडलं पाहिजे. माझी मुलगी पार्लर चालवून त्यांच्या मुलाचं पालन-पोषण करत होती. त्यांनी तिचा छळ केला. या प्रकरणात संपूर्ण कुटुंब सामील होतं आणि त्यांनी निक्कीची हत्या केली.
ADVERTISEMENT
