nalasopara crime : आधी सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवलं नंतर पीडित विद्यार्थिनीला थांबवत तिच्यासोबत...शिक्षकाचं हैवानी रुप

Nalasopara Crime : पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षक विद्यार्थिनींसोबत वाईट कृत्य केल्याचा आरोप आहे. शिक्षकाच्या अशा हैवानी कृत्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे.

nalasopara crime

nalasopara crime

मुंबई तक

• 03:00 PM • 25 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

नालासोपाऱ्यात गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा

point

शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

point

पालकांनी दिला चोप

Nalasopara Crime : पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षक विद्यार्थिनींसोबत वाईट कृत्य केल्याचा आरोप आहे. शिक्षकाच्या अशा हैवानी कृत्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी शिक्षकाचे नाव राहुल दुबे असे आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Amit Shah Interview : माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

भयंकर कृत्य 

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दुबे गेली काही वर्षे IINT या अकॅडमीत विद्यार्थ्यांची शिकवणी घेतो. त्याच नराधम शिक्षकाने विद्यार्थिनींची छेड काढली होती. विद्यार्थिनीने अनेकदा विरोध दर्शवला असता, पीडितेनं घरी काहीच सांगितलं नाही. अंतिम क्षणी पीडितेनं आपल्या घरी घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पालकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली असता, त्यांनी अकॅडमी गाठली होती.

शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य

या घटनेपूर्वी आरोपी नराधमानं सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवले आणि विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. पण, त्या विद्यार्थिनीनं तिथून पळवाट काढली. त्यानंतर पीडितेनं घडलेल्या घटनेची माहिती सांगितली असता, पालकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी शिक्षकाचा चांगलाच चोप दिला. संबंधित प्रकरणात आरोपीला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : पती बाहेरगावी अन् वहिनीच्या खोलीत भलतंच कोणीतरी शिरलं, दीरानं रंगेहाथ पकडलं, तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून घेतली उडी अन्..

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनीवर

गुरू आणि शिष्याचं नात्यासारकं नातं या जगात कुठेच सापडणार नाही. पण, नालासोपाऱ्यात घडलेल्या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनं गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासली गेली आहे. असे प्रकार आता उघडकीस येऊ लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरनीवर आला आहे.

    follow whatsapp