पती बाहेरगावी अन् वहिनीच्या खोलीत भलतंच कोणीतरी शिरलं, दीरानं रंगेहाथ पकडलं, तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून घेतली उडी अन्..

Crime News : एका अज्ञात व्यक्ती घरात पती नसताना महिलेला भेटायला आला. तेव्हा महिलेच्या दीराला आपल्या वहिनीसोबत कोणीतरी बोलतंय असा संशय बळावला गेला. त्यानंतर तरुणाने भयभीत होत दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने भयंकर घडलं.

crime news

crime news

मुंबई तक

25 Aug 2025 (अपडेटेड: 25 Aug 2025, 02:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वहिनीच्या खोलीत भलतंच कोणीतरी शिरलं

point

दीराने पकडलं रंगेहाथ

point

नंतर भयंकर घडलं?

Crime News : देशभरात अनैतिक संबंधाच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. या अनैतिक विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे संसार मोडले गेले आहेत. एवढंच नाही,तर हल्ली काही महिला आपला पती घरी नसल्यावर तरुणांना बोलावतात आणि अनैतिक संबंध ठेवतात. पण नंतर हीच गोष्ट पतीला कळाल्यानंतर मग दोघांच्याही नात्यात दुरावा निर्माण होऊन होत्याचं नव्हतं होऊन बसतं,अशीच एक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्ती घरात पती नसताना महिलेला भेटायला आला. तेव्हा महिलेच्या दीराला आपल्या वहिनीसोबत कोणीतरी बोलतंय असा संशय बळावला गेला. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : "पोलिसांचा वापर करत फडणवीस मराठ्यांना त्रास देतात, एवढंच वाटतं तर महादेव मुंडे.." जरांगेंची तोफ धडाडली, मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही

नेमकं रात्री काय घडलं? 

दरम्यान, घरात नवरा कामानिमित्त बाहेर असताना, दीर पत्नीच्या बेडरूममध्ये घुसला. बेडरममध्ये परपुरूष आणि वहिनीला पाहून दीराच्या पायाखालची जमीनच सरकली. आतील दृष्य पाहून दीराने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दीराला पाहून वहिनीला भेटायला आलेला तरुणही भायभीत झाला आणि तिथून पळवाट काढू लागला. त्याने आपले प्राण वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली, पण त्याला जबर दुखापत झाली.

दूसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे तरुणाची हाडं फ्रॅक्टर झाली. तसेच त्यात त्याचं कंबरही मोडल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला जबर मार बसला असून त्याला मुक्कामार लागला. त्याला असहाय्य वेदना होत आहेत. महिलाने कुटुंबीयांसोबत मिळून तरुणाविरोधात एफआरआय दाखल केली. या घडलेल्या घटनेची माहिती संपूर्ण गावाला मिळाली असता, हे प्रकरण समोर आलं. महिलेच्या दीराचं म्हणणं आहे की, रात्री माझी झोप मोड झाली असता, मला वहिनीच्या खोलीत एक व्यक्ति दिसली होती.

तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी 

त्यानंतर त्याने खोलीत जाऊन पाहिले असता, तिथं एक व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होता. दीराने सांगितलं की, जेव्हा पाहून आरडाओरड केली तेव्हा तो बाहेर गेला. तेव्हा त्याने भयभीत होऊन दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि त्यात त्याची कंबर चांगलीच मोडली. रुग्णावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : मुंबईत हळहळ! जवळच्या नातेवाईकानेच काढला काटा, आधी अपहरण अन् नंतर हत्या, एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह

तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचं म्हणणं आहे की, तिचा पती हा बाहेर नोकरीसाठी गेला आहे. दुसऱ्या मजल्यावर ती आपल्या मुलाबाळांसोबत राहायची. 18 ऑगस्ट रोजी एक तरुण तिच्या घरी आला होता. तेव्हा दीराने तरुणाला पाहिले असता, तरुणाने भयभीत होऊन दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

 

    follow whatsapp