School Shocking News Viral : हरियाणात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. असंध ब्लॉकच्या एका सरकारी प्राथमिक शाळेत 54 वर्षांच्या मुख्याध्यापकाने संतापजनक कृत्य केलं. दुसरी आणि चौथी इयत्तेत शिकणाऱ्या 11 अल्पवयीन विद्यार्थीनींवर नराधम मुख्याध्यापकाने लैंगिक शोषण केलं, असा आरोप करण्यात आला आहे. दयानंद असं आरोपी मुख्याध्यापकाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
10 विद्यार्थीनींनी मुख्याध्यापकावर केले लैंगिक शोषणाचे आरोप
हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं, जेव्हा पीडित विद्यार्थीनीने या धक्कादायक घटनेबाबत त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर लोकांनी गुरुवारी पोलिसांना संपर्क केला आणि घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर असंध महिला पोलीस आणि बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) च्या एका टीमने शुक्रवारी शाळेत पंचनामा केला. तपासादरम्यान समोर आलं की, जवळपास 10 अन्य विद्यार्थीनींनी मुख्याध्यापका विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
हे ही वाचा >> मनसेला मतं पडतात जर सगळंच काढलं तर 10-12 वर्षांचा खेळ... मतांच्या चोरीवरून राज ठाकरेंचं रोखठोक विधान
6 ते 8 वर्षांच्या विद्यार्थींनींचं नराधम मुख्याध्यापक लैंगिक शोषण करायचा, अशी माहिती पीडित मुलींनी दिली. सीडब्ल्यूसीचे अध्यक्ष उमेश चनाना यांनी म्हटलं की, गुरुवारी FIR दाखल झाल्यानंतर त्यांच्या टीमने शुक्रवारी शाळेत जाऊन पंचनामा केला आणि पीडित विद्यार्थीनींचं समुपदेशन केलं. पीडित मुलींच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
असंधचे डीएसपी गोरखपाल राणा यांनी म्हटलं की, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल केलं जाईल. जेणेकरून पीडित मुलींना लवकरात लवकर न्याय मिळेल. त्यांनी म्हटलं, हे एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे. शैक्षणिक संस्थेत मुलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी कठोर पावलं उचलली जातील.
हे ही वाचा >> मुंबईत खळबळ! लोकमान्य टिळक स्थानकाच्या एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह, सूरत येथून अपहण अन् भयंकर कांड
ADVERTISEMENT
