Dowry Crime : आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही आजही आपल्या देशात जात-धर्म, स्त्री-पुरूष असामानता, हुंडाबळीसारख्या असंख्य घटना आजही घडताना दिसतात. अशीच एक घटना नोएडातून समोर आली आहे. नोएडाच्या कसना पोलीस ठाणे परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी सूनेची हत्या केली आहे. यामुळे कासना पोलीस ठाणे परिसरात खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईत खळबळ! लोकमान्य टिळक स्थानकाच्या एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह, सूरत येथून अपहण अन् भयंकर कांड
नेमकं काय घडलं?
दादरीतील रुपबास येथील रहिवासी असलेल्या निक्की आणि तिची बहीण या दोघांचे 2016 मध्ये सिरसा गावातील रहिवासी असलेल्या विपिनशी आणि त्याच्या भावाशी विवाह झाला होता. एकाच घरात राहणाऱ्या दोन्ही बहिणींच्या विवाहामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पण विवाहानंतर विपिन आणि निक्की यांच्या नात्याला कोणाची नजर लागली असेल? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांमध्ये वाद उफळू लागला होता.
हुंड्यासाठी सूनेला 35 लाखांची मागणी
आई-वडिलांनी आपल्या ऐपतीनुसार लग्नात खर्च केला होता. पण सासरच्यांना कसलंही समाधान वाटत नव्हते. ते सतत हुंड्यासाठी निक्कीचा छळ करू लागले होते. सासरच्या मंडळींनी 35 लाखांची मागणी केली होती. हुंड्याचे पैसे न मिळाल्याने विपिन आणि त्याची आई दोघेही अनेकदा पीडित सून निक्कीला मारहाण करायचे. विपिनला दारू पिण्याचे व्यसन होते. तो अनेकदा दारू पिऊन घरी येत असे आणि निक्कीला मारहाण करायचे. जर निक्कीने मारहाण करताना विरोध केला तर तिचा नवरा आणि सासू तिला मारहाण करायचे.
ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी 21 ऑगस्ट रोजी आरोपींनी निक्कीवर काही ज्वलनशील पदार्थ फेकले आणि तिला चटके दिले. या प्रकारादरम्यान, पीडित निक्कीची बहीण त्याच ठिकाणी घटनास्थळी दाखल झाली. तेव्हा बहिणीने सासरच्यांनी केलेल्या अशा हैवानी कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि आपल्या कुटुंबियांना पाठवला.
हे ही वाचा : पुण्यातील भररस्त्यात शाळेच्या आवारात तरुणींच्यात तुफान राडा, बॉयफ्रेंडला मेसेज केल्यानं लाथा बुक्क्यांनी मारहाण अन् वाद पेटला
व्हिडिओ पाहिल्यानंतर निक्कीच्या माहेरच्या सदस्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तेव्हा संबंधित प्रकरणाची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
