पती घरी नसताना मध्यरात्री वहिनीच्या खोलीत अज्ञात पुरुष... दीराने पाहिलं म्हणून दुसऱ्या मजल्यावरून उडी अन्...

उत्तर प्रदेशातील गोरखपुरमध्ये मध्यरात्री एका महिलेच्या घरी अज्ञात पुरुष शिरला. संबंधित महिलेचा पती कामानिमित्त घराच्या बाहेर होता. संबंधित महिलेच्या दीराला संशय आला आणि त्याने खोलीत पाहिल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला.

पती घरी नसताना मध्यरात्री वहिनीच्या खोलीत अज्ञात पुरुष...

पती घरी नसताना मध्यरात्री वहिनीच्या खोलीत अज्ञात पुरुष...

मुंबई तक

• 10:27 AM • 24 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मध्यरात्री वहिनीच्या खोलीत शिरला अज्ञात पुुरुष

point

दीराने पाहिलं अन् गोंधळ घातला... नेमकं काय घडलं?

Crime news: उत्तर प्रदेशातील गोरखपुरमध्ये मध्यरात्री एका महिलेच्या घरी अज्ञात पुरुष शिरला. संबंधित महिलेचा पती कामानिमित्त घराच्या बाहेर होता. 18 ऑगस्टच्या रात्री महिलेच्या खोलीतून दुसऱ्याच पुरुषाचा आवाज ऐकू येत होता.  हे ऐकून संबंधित महिलेच्या दीराला संशय आला आणि त्याने खोलीत पाहिल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याने घरात गोंधळ घातला. 

हे वाचलं का?

दीराच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सर्वत्र गोंधळ उडाला. त्यावेळी वहिनीला भेटायला आलेला माणूस पकडला जाईल या भीतीने घरातून पळू लागला. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि त्यामुळे त्याच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला आणि त्याच्या कंबरेची हाडं मोडल्याचं देखील सांगितलं जात आहे. हाडं मोडल्यामुळे संबंधित तरुण तिथून पळून जाऊ शकला नाही. त्याला असह्य वेदना होत होत्या आणि तरुणाचा आवाज ऐकून लोक घटनास्थळी पोहचले. 

कुटुंबियांसह पोलिसात तक्रार दाखल 

गावकऱ्यांनी संबंधित तरुणाला रुग्णालयात नेलं आणि तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर त्या महिलेनं तिच्या कुटुंबियांसह संबंधित तरुणाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. हे प्रकरण गोरखपुरच्या गुलरिहा परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. गुलरिहा पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे ही वाचा:  'त्या' कारणामुळे केली पत्नीची हत्या, नंतर मृतदेह जमिनीत पुरला अन् स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये जाऊन... नेमकं प्रकरण काय?

दीरानं सांगितला घटनाक्रम...

महिलेच्या दीराने सांगितल्याप्रमाणे, रात्री अचानक जाग आल्यानंतर दीराने वहिनीच्या खोलीत एक व्यक्ती खोलीत शिरत असल्याचं पाहिलं. त्यावेळी ही व्यक्ती नेमकी कोण आहे? असा प्रश्न त्याला पडला. त्यानंतर त्याने खोलीत जाऊन याचा तपास करण्याचं ठरवलं. तो खोलीत गेल्यानंतर ती व्यक्ती तिथेच होती. पण वहिनी झोपली होती. दीराने हे पाहिल्यानंतर त्याने ओरडायला सुरूवात केली आणि संबंधित तरुण बाहेर पळाला. दीराने त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि त्यामुळे त्याच्या कंबरेची हाडंच मोडली. 

हे ही वाचा: पतीने केलेलं 'ते' भाकीत खरं ठरलं! रात्री दारूच्या नशेत घरी आला अन् पत्नीने साडीनेच...

महिलेनं काय सांगितलं? 

सध्या त्या तरुणावर गोरखपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी दुसऱ्या समुदायाचा असल्याचं सांगितलं जात आहे. तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि ती तिच्या मुलांसोबत घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहते. 18 ऑगस्टच्या रात्री गावातील दुसऱ्या एका तरुणाने महिलेच्या खोलीत गुपचूप प्रवेश केल्याचा आरोप आहे. महिलेच्या दीराने त्याला खोलीत येताना पाहिले तेव्हा पकडलं जाण्याच्या भीतीने त्या तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामुळे त्याचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला आणि त्याचा कंबरेची हाडंही मोडली.

    follow whatsapp