maharashtra news : पतीने आपल्या पत्नीची हत्या करत तिला जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. ही घटना वर्धा येथील हिंगणघाटातील आहे. त्यानंतर आरोपी पती हा स्वत: पोलीस ठाण्यात गेला आणि पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पण जेसीबीमुळे या प्रकरणाचं गूढ आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात दोन्ही गटात तुफान राडा, आधी दगडफेक नंतर वाहनंच पेटवली, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?
नेमकं काय घडलं?
पती-पत्नीत होणाऱ्या वारंवार वादाला कंटाळून पतीने चार दिवसांपूर्वी आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर पत्नीचा मृतदेह हा हिंगणघाट परिसरातील जेसीपीच्या अधारे खोदून गाडण्यात आला होता. त्यानंतर आपली पत्नी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हिंगणघाट पोलिसांनी संबंधित प्रकरणात सखोल चौकशीनंतर एक मोठं गूढ उकललं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली .
काही दिवसांपूर्वी हिंगणघाटच्या इंदिरा वॉर्ड परिसरातील रहिवासी असलेल्या सुभाष लक्ष्मण वैद्य यांनी 19 ऑगस्ट रोजी हिंगणघाट पोलिसांकडे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. संबंधित प्रकरणात तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशय आला. त्याच वेळी, मृत माधुरीच्या नातेवाईकांनीही पतीवर संशय व्यक्त केला, त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरु केला.
खोल खड्डा खोदण्याचे कारण काय?
काही दिवसांपूर्वी पोलिसांना माहिती मिळाली की, घराजवळ पावसाचे साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या मदतीने खोल खड्डा खोदण्यात आला होता. तपासादरम्यान, खोल खड्डा खोदण्याचे कारण काय? असा जेसीबीच्या मालकाला प्रश्न उपस्थित केला असता, त्याने पावसाचे कारण सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला एवढा मोठा खड्डा खोदण्याचे कारण विचारले, त्यावर त्याला काहीही सांगता आलं नाही.
हे ही वाचा : विकृतीचं टोक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् जेल, चौदा वर्षानंतर आला बाहेर अन् दुसऱ्याच पीडितेवर...सुरूच खेळ
यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाची मदत घेत खड्ड्याचे खोदकाम केले असता, त्यात मृतदेह आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतले असून सुभाष सध्या फरार आहे.
ADVERTISEMENT
